Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये चांगले व्याजदर दिले जातात. वेगवेगळ्या योजनांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याजदर लागू असतात. अशातच जर तुम्ही पोस्टात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा योजनांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला सर्वाधिक व्याजदर दिला जात आहे.
यामध्ये टीडी स्कीम, आरडी स्कीम, एमआयएस स्कीम, पीपीएफ स्कीमचा समावेश आहे परंतु पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटमध्ये तुम्हाला जास्त रिटर्न दिले जात आहेत. तुमच्या माहितीसाठी, सध्या आरडी स्कीममध्ये 5 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 6.7 टक्के व्याजदर लागू आहे. अशास्थितीत जर तुम्हाला जास्त परताव्याची योजना हवी असेल तर यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.
देशातील कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत गुंतवणूक करू शकते. आणि सध्या त्यावर ६.७ टक्के व्याजदर लागू आहे. यात एकल आणि संयुक्त दोन्ही खाती उघडण्याची सुविधा आहे. यासोबतच पालकांच्या कागदपत्रांच्या आधारे मुलांचे खातेही उघडता येते. यामध्ये किमान ठेव 100 रुपये आणि 10 रुपयांच्या पटीत करता येते. तथापि, जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही.
तुम्ही आरडी स्कीममध्ये दरमहा 600 रुपये गुंतवल्यास तुम्हाला 6.7 टक्के व्याज मिळेल. आणि परिपक्वता कालावधी 5 वर्षे आहे. ज्यामध्ये तुमची वार्षिक ठेव रक्कम 7200 रुपये आहे आणि 5 वर्षांची गुंतवणूक 36000 रुपये आहे. यावर, तुम्हाला सध्या लागू असलेल्या ६.७ टक्के व्याजदरानुसार ६,८१९ रुपये व्याजाची रक्कम मिळते. म्हणजेच तुम्हाला मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 42,819 रुपये परत मिळतील.
तुम्ही आरडी स्कीम अंतर्गत कर्जाची सुविधा देखील घेऊ शकता. यासाठी 1 वर्षासाठी सतत 12 हप्ते जमा करावे लागतील. यानंतर ठेव रकमेच्या 50 टक्के रक्कम कर्ज म्हणून घेता येईल. कर्जावर व्याज आणि इतर अनेक नियम लागू होतात. ही माहिती तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये मिळू शकते. किंवा तुम्ही ते https://www.indiapost.go वरून ऑनलाइन देखील मिळवू शकता.