आर्थिक

PPF मधील गुंतवणूक की SIP द्वारे गुंतवणूक योग्य? कोणती गुंतवणूक तुम्हाला लवकर करोडपती बनवेल? पहा..

Published by
Ahmednagarlive24 Office

सध्याच्या काळात गुंतवणूक आणि भविष्याची प्लॅनिंग याबाबत चांगली जागरूकता निर्माण झाली आहे. अनेक व्यक्ती आपल्या रिटायरमेंट फंड बाबत जागरूक दिसतो. परंतु सामान्यपणे जर आपण पाहिले तर भविष्यासाठी एक मोठा फंड तयार करण्यासाठी लोक पीपीएफचा युज करतात. पीपीएफ मध्ये सुरक्षित गुतंवूक असते त्यामुळे सिक्युअर परतावा मिळण्यासाठी लोक हेच ऑप्शन घेतात.

परंतु तुम्हाला माहित आहे का की तुम्ही पीपीएफ पेक्षा एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जर केली तर तर करोडो रुपये भविष्यासाठी सेव्हिंग करू शकता. जर तुम्ही योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर तुम्ही 2 कोटी रुपये सहज कमवू शकता. येथे आपण सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे दर महिन्याला काही छोटी रक्कम गुंतवली तर कशा पद्धतीने दोन कोटींचा फंड उभा करू शकतो याविषयी जाणून घेऊयात.

एसआयपी द्वारे किती बचत करणे गरजेचे आहे?

तुम्ही दररोज 100 किंवा 200 रुपयांची बचत करून सुरुवात केली पाहिजे. म्हणजेच तुम्ही महिन्याला 3000 ते 6000 रुपये वाचवले पाहिजेत. असे केले तर तुम्ही वर्षाला 36000 ते 72000 रुपये वाचवू शकता व इन्व्हेस्ट करू शकता.

पब्लिक प्रोविडेंट फंड अर्थात पीपीएफचे कॅल्क्युलेशन

PPF मध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर ठरते. हा गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग आहे आणि व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम टॅक्सफ्री असते. 15 वर्षात पीपीएफ मॅच्युअर होते. PPF वर सध्या 7.1 टक्के व्याज मिळत आहे. जर तुम्ही PPF मध्ये दरवर्षी 72,000 रुपये गुंतवले तर 15 वर्षांत ही रक्कम 19,52,740 रुपये होईल. तुम्ही हे पैसे 20 वर्षांसाठी जमा करत राहिल्यास, तुम्ही 31,95,978 रुपये मिळवाल.

आता पाहू एसआयपी चे कॅल्क्युलेशन

SIP द्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला PPF पेक्षा जास्त रिटर्न मिळतील. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्हाला त्यावर साधारण 10 ते 12 टक्के रिटर्न मिळू शकतो. तुम्ही 25 वर्षे सतत वार्षिक 72,000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला 80 लाख रुपये मिळतील.

जर ही एसआयपी 30 वर्षांसाठी केली तर 1,30,00,000 रुपयांपर्यंत तुम्हाला रिटर्न मिळू शकतो. जर तुम्ही म्युच्युअल फंडात 30 वर्षे सतत 72,000 रुपये गुंतवले तर 12 टक्के व्याजदराने ही रक्कम 2,11,00,000 रुपयांपेक्षा जास्त असेल. म्हणजेच तुम्हाला पीएफ पेक्षा जास्त रिटर्न मिळतील.

Ahmednagarlive24 Office