आर्थिक

वापरा ‘हा’ फॉर्म्युला आणि PPF योजनेत पैसे गुंतवा! मिळेल लाखो करोडोत परतावा

Published by
Ratnakar Ashok Patil

Investment Formula:- जेव्हा आपण कुठल्याही गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूक करतो तेव्हा गुंतवणूक करताना जर एखाद्या विशिष्ट पद्धतीने किंवा एखाद्या निश्चित अशा मार्गाने केली तर नक्कीच परतावा चांगला मिळतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे गुंतवणुकीमध्ये सातत्य तर राहतेच आणि चांगला परतावा आपल्याला त्या माध्यमातून मिळू शकतो.

त्यामुळे कुठल्याही गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूक करताना अनेक पद्धतीचे फॉर्मुले वापरले जातात व अशा पद्धतीच्या फॉर्मुल्यांचा वापर करून जर गुंतवणूक केली तर त्यामध्ये नियमितपणा देखील राहतो आणि सातत्य टिकून दीर्घ कालावधीत चांगला पैसा परताव्याच्या स्वरूपात मिळतो.

अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला देखील जर पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपण या लेखामध्ये असा एक फार्मूला बघणार आहोत जो तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल.

पीपीएफ योजनेत गुंतवणुकीसाठीचा फॉर्मुला
तुम्हाला जर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ खात्यात पैसे जमा करून चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही 15-5-5 या फार्मूल्याचा वापर करू शकतात. तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ खात्यामध्ये पंधरा वर्षे गुंतवणूक करू शकतात

व अगदी पाचशे रुपये पासून गुंतवणूक तुम्ही या माध्यमातून सुरू करू शकतात व कमाल दीड लाख रुपयांपर्यंत पैसे गुंतवू शकतात. सध्या या योजनेमध्ये 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे व इतकेच नाहीतर चक्रवाढीचा म्हणजेच कंपाऊंडिंगचा फायदा देखील तुम्हाला यामध्ये मिळतो.

या फॉर्मुल्याचे कॅल्क्युलेशन
या फार्मूल्यानुसार तुम्ही पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षाला दीड लाख रुपयांची रक्कम खात्यामध्ये गुंतवायची आहे. तसेच पंधरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेत आणखीन पाच वर्षांसाठी वाढ करून गुंतवणूक सुरू ठेवायचे आहे. तसेच वाढवलेले पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणखीन पाच वर्षांसाठी योजना वाढवून तुम्ही एकूण 25 वर्षे पीपीएफ खात्यात पैसे गुंतवायचे आहेत.

अशा पद्धतीने तुम्ही तुमची एकूण गुंतवणूक 37.5 लाख रुपये इतकी करतात. या गुंतवलेल्या पैशांवर 7.1 टक्के परताव्यानंतर 65.58 लाख रुपये व्याज स्वरूपात तुम्हाला मिळतील. अशा पद्धतीने तुमची व्याजाची रक्कम आणि तुमची गुंतवलेली मुद्दल मिळून खात्यामध्ये एक कोटींचा फंड तयार होईल.

Ratnakar Ashok Patil

Published by
Ratnakar Ashok Patil