आर्थिक

Investment Formula: ‘या’ फॉर्मुल्यानुसार गुंतवणूक करून 1 कोटी जमा करा! पण कसे होईल शक्य?

Published by
Ajay Patil

Investment Formula:- आजकाल साधारणपणे मध्यमवर्ग कुटुंबांकडे देखील चांगल्यापैकी पैसे असतात व अशा व्यक्तींनी जर उपलब्ध असलेल्या गुंतवणूक पर्यायांपैकी चांगल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये शिस्तबद्ध रीतीने व सातत्य ठेवून गुंतवणूक केली तर कोट्यावधी रुपयांचा निधी जमा करता येणे शक्य आहे.

कारण अनेक पर्यायांमध्ये चक्रवाढ व्याजाचा लाभ दिला जातो व याची जादू खूप वेगळी असते. समजा तुम्ही जर एखाद्या योजनेतील कोटी रुपये गुंतवले यावर जर तुम्हाला 15 टक्के वार्षिक परतावा मिळाला तर पुढच्या पाच वर्षात तुमचे पैसे एक ते दोन कोटी पर्यंत वाढतात

ही जादू चक्रवाढीचे असते. परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो की सुरुवात करायला आपल्याकडे एक कोटी रुपये येतील कुठून? पण हे देखील सोपे आहे व याकरता जर 15-15-15 चा फॉर्मुला गुंतवणुकीसाठी वापरला तर तुम्ही पंधरा वर्षात एक कोटी रुपयांचे मालक होऊ शकतात. नेमका फॉर्मुला कसा आहे? त्याबद्दलची माहिती घेऊ.

15-15-15 चा फॉर्मुला आहे गुंतवणुकीसाठी महत्त्वाचा

जर तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली व यामध्ये जर हा फॉर्म्युला वापरला तर तुम्ही पंधरा वर्षांमध्ये एक कोटी रुपयांचे मालक होऊ शकतात. समजा यामध्ये तुम्ही  एखाद्या फंडात प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपयांची एसआयपी करणे गरजेचे आहे.

हे 15000 ची एसआयपी तुम्हाला पंधरा वर्षे करावी लागेल व यावर जर तुम्हाला वार्षिक 15 टक्के दराने परतावा मिळाला तर पंधरा वर्षात तुमच्याकडे एक कोटी रुपयांचा निधी जमा होतो. हे शक्य होऊ शकते परंतु बऱ्याचदा आपण जे काही पैसे कमवतो त्याचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य होत नाही व इथे सारे चुकते.

जर समजा तुम्हाला पन्नास हजार रुपये पगार मिळतो व त्यामधून आपण शॉपिंग किंवा चित्रपट पाहणे, बाहेर जेवायला जाणे किंवा इतर गोष्टींवर अगोदर खर्च करतो. त्यानंतर जे काही पैसा उरतो तो आपण गुंतवतो. पण ही जी काही पद्धत आहे ती गुंतवणूक सल्लागारांच्या मतानुसार बघितले तर ते ही पद्धत चुकीची मानतात.

 बचतीचे योग्य सूत्र वापरावे

याकरिता खरोखर पैसे कमवायचे असतील तर आपला जो काही बजेट असतो त्याचे व्यवस्थापन करता येणे गरजेचे आहे. याबाबत बचतीचे योग्य सूत्र सांगताना गुंतवणूक सल्लागार म्हणतात की,  बचत= उत्पन्न- खर्च हे काही योग्य सूत्र नाही. या ऐवजी खर्च= उत्पन्न- बचत हे योग्य सूत्र आहे.

म्हणजे अगदी सोप्या शब्दात समजायचे असेल तर प्रत्येक महिन्याला जर तुम्हाला पंधरा हजार रुपये बचत करायचे असतील तर तुमचा पगार मिळताच त्यामधून पंधरा हजार रुपये तुम्ही गुंतवणूक गरजेचे आहे व उरलेल्या 35 हजार रुपयांमध्ये तुमचा घर खर्च व इतर खर्च मॅनेज करणे महत्त्वाचे ठरते.

खर खर्चासाठी तुम्हाला जास्तीचा पैसा वाचवायचा असेल तर त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला कोणत्या ठिकाणाहून तुम्हाला पैसे वाचवता येतील याची नियोजन करावे लागेल व त्यानुसार तुम्ही इतर खर्चात कपात करू शकता. ज्या खर्चामुळे तुम्हाला जास्त काही फरक पडणार नाही.

भविष्याच्या आर्थिक समृद्धीकरिता अशा पद्धतीची तयारी खूप फायद्याचे ठरेल. या फार्मूलानुसार तुम्ही दरमहा पंधरा हजार रुपये गुंतवू शकतात व पुढील पंधरा वर्षात तुम्हाला एक कोटी रुपयांपर्यंतचा निधी या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil