आर्थिक

Investment In Gold: टाटाने आणली आता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी! 100 रुपयात करता येणार सोन्यात गुंतवणूक

Published by
Ajay Patil

Investment In Gold:- कष्टाने कमावलेला पैसा आणि त्या पैशाची करण्यात येणारे गुंतवणूक ही खूप महत्त्वाचे असते. भविष्यकालीन आर्थिक गरजांच्या दृष्टिकोनातून किंवा आर्थिक सुरक्षिततेच्या अनुषंगाने गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. त्यामुळे व्यक्ती वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करून त्यामध्ये गुंतवणूक करत असतात.

गुंतवणूक करताना प्रामुख्याने केलेली गुंतवणूक ही सुरक्षित राहील आणि त्या गुंतवणुकीवर मिळणारा जो काही परतावा आहे तो आपल्याला चांगला मिळावा अशी अपेक्षा बहुतेक गुंतवणूकदारांची असते. गुंतवणुकीचे पर्याय पाहिले तर शेअर मार्केट, एलआयसी, विविध बँकांमध्ये केली जाणारी मुदत ठेव, म्युच्युअल फंड एसआयपी इत्यादी पर्याय उपलब्ध असतात.

त्याशिवाय रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये देखील बरेच जण गुंतवणूक करत असतात. परंतु गुंतवणुकीच्या या सगळ्या पर्यायांमध्ये सोन्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. आज जर आपण सोन्याचे भाव पाहिले तर ते जवळपास 65 हजार प्रति दहा ग्राम इतक्या उच्चांकी पातळीवर आहेत. याच अनुषंगाने तुम्हाला देखील जर सोन्यामध्ये गुंतवणूक करायचे असेल तर टाटा समूहाने एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.

 शंभर रुपयांमध्ये सोन्यात करता येईल गुंतवणूक

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोन्यात गुंतवणूक करणे म्हणजे सोन्याचे दागिने किंवा नाणी इत्यादी घेणे असे साधारणपणे या गुंतवणुकीचे स्वरूप आहे. परंतु आता काळ बदलला असून त्यानुसार सोन्यात गुंतवणूक करण्याच्या पद्धतीत देखील बदल झाला आहे. त्यानुसार तुम्ही आता फक्त शंभर रुपये घेऊन देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

याकरता टाटा समूहाने एक संधी उपलब्ध करून दिली असून या समूहाच्या तनिष्क हा देशातील टॉप ज्वेलरी ब्रँड असून या माध्यमातूनही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे परंतु सोने खरेदी करायचे नाही तर अशा परिस्थितीत तुम्ही तनिष्काच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात व तीही फक्त शंभर रुपयांमध्ये.

तनिष्क ब्रँड डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. याकरिता तनिष्क शोरूम तसेच तनिष्क वेबसाईटवर ऑनलाईन गुंतवणूक देखील करता येणार आहे. या डिजिटल गोल्ड स्कीममध्ये फक्त शंभर रुपये सोन्यात गुंतवून तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात. जर हे सोने पाहिले तर ते 24 कॅरेट सोन्यासारखेच आहे.

फक्त ते डिजिटल स्वरूपात असणार आहे. तुम्हाला जर सोन्याचे दागिने बनवायचे असतील व त्याकरिता तुम्ही पैशांची बचत करत असाल तर तनिष्काने उपलब्ध करून दिलेला हा डिजिटल सोन्याचा पर्याय देखील तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो. या पर्यायातून सोने खरेदी करण्याचे अनेक फायदे देखील आहेत.

जसे की तुम्हाला बँक लॉकर करिता महाग भाडे द्यावे लागणार नाही. तसेच या पद्धतीचे डिजिटल सोने तुम्ही कधीही ऑनलाईन पद्धतीने विकू शकतात व पेमेंट डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा करू शकतात. तसेच हे डिजिटल सोने तुम्ही तनिष्क शोरूम मध्ये पूर्ण भावात देऊन कोणतेही दागिने खरेदी देखील करू शकतात.

Ajay Patil