Investment In Stock:- अनेक व्यक्ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. परंतु आपल्याला माहित आहे की शेअर मार्केटमध्ये बऱ्याचदा चढ-उतार होत असते. कधी कधी शेअर मार्केट खूप उच्चांकी पातळीवर असते तर कधी कधी घसरणीचा फटका देखील बसतो. बाजारावर अनेक जागतिक आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा देखील तेवढाच प्रभाव पडत असतो.
या सगळ्या घडामोडी किंवा बाजारातील ट्रेंडच्या आधारावर कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी याबाबतचा सल्ला देखील तज्ञ देतात. कमीत कमी कालावधीच्या गुंतवणुकीमध्ये जर चांगला परतावा हवा असेल तर गुंतवणूक तज्ञांनी या यादीमध्ये काही शेअर्सची माहिती देखील सांगितलेली आहे. त्यातील काही महत्त्वाच्या शेअर्सची माहिती घेऊ.
कमी काळात चांगला परतावा देऊ शकणारे शेअर्स
1- टायटन कंपनी– यामध्ये शेअर बाजारातील काही तज्ञांनी टायटन कंपनीच्या शेअरची खरेदी करण्याचा सल्ला दिला असून याकरिता प्रति शेअर टारगेट हे 3550 असून ब्रोकरेजने 3280 रुपयांचा स्टॉप लॉस देखील दिला आहे.
2- सिटी युनियन बँक– तसेच काही तज्ञांनी सिटी युनियन बँकेच्या शेअर्सची खरेदी करण्याचा देखील सल्ला दिलेला आहे. याकरिता प्रतिशेअर्स लक्ष हे 160 रुपये ठेवण्यात आलेले असून ब्रोकरेजने या शेअर्स करिता 140 रुपयांचा स्टॉप लॉस दिलेला आहे.
3- हिरो मोटोकॉर्प– तसेच काही तज्ञांनी हिरो मोटोकॉर्प च्या शेअरची खरेदी करण्याचा देखील सल्ला दिलेला आहे. याकरिता प्रति शेयर लक्ष हे 3600 असून ब्रोकरेजने शेअर्स करिता 3150 रुपयांचा स्टॉप लॉस दिलेला आहे. 16 नोव्हेंबरला हा शेअर 147 रुपयांवर बंद झाला होता.
4- श्रीराम फायनान्स– काही तज्ञांनी श्रीराम फायनान्सच्या शेअरची खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे. यासाठी प्रत्यक्ष टार्गेट 2100 रुपये असून ब्रोकरेजने शेअर्स करिता 1980 रुपयांचा स्टॉप लॉस दिलेला आहे.
5- कोफोर्ज–शेअर बाजारातील तज्ञ जयेश भानुशाली कोफोर्जच्या शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला असून याकरिता प्रति शेअर टार्गेट 5500 असून ब्रोकरेजने शेअर्स साठी 5230 रुपयांचा स्टॉप लॉस दिलेला आहे.
( कुठलीही गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.)