आर्थिक

Investment Plan: महिन्याला 1 हजार रुपयांची गुंतवणूक बनवेल तुम्हाला 65 लाखांचा धनी! पण कसे? वाचा डिटेल्स

Published by
Ajay Patil

Investment Plan:- गुंतवणूक ही बाब प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची असून भविष्यकाळ आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध राहावा याकरिता गुंतवणुकीची भूमिका अन्यसाधारण असते. सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत व यातून प्रत्येक गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी  सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या पर्यायाची निवड करतात व त्यामध्ये गुंतवणूक करतात.

गुंतवणुकीसाठी बँकेच्या मुदत ठेव योजना तसेच पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक योजना आहेत व या योजना गुंतवणुकीचे सुरक्षितता व परताव्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात. याव्यतिरिक्त शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड एसआयपी या दोन पर्यायांचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो.

यातील म्युच्युअल फंड एसआयपी हा पर्याय गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असून यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो व त्यामुळे परतावा देखील चांगला मिळतो.

त्यामुळे म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये तुम्ही जर प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये सलग 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्ही 65 लाख रुपये एसआयपीच्या माध्यमातून जमा करू शकतात. याबद्दलची माहिती या लेखात आपण घेऊ.

 महिन्याला एक हजाराची गुंतवणूक 35 वर्षांनी बनवेल तुम्हाला 65 लाखांचा मालक

तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षापासून महिन्याला एक हजार रुपयाची गुंतवणूक करणे गरजेचे असून गुंतवणूक तुम्हाला 35 वर्षे पर्यंत सातत्याने सुरू ठेवणे गरजेचे राहील. वयाच्या 25 व्या वर्षापासून तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात केली की वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत तुम्हाला गुंतवणूक चालू ठेवावी लागेल.

अशाप्रकारे 35 वर्षे सातत्याने तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये महिन्याला एक हजार रुपये गुंतवत गेल्यास तुमची एकूण चार लाख वीस हजार रुपये रक्कम यामध्ये जमा होते. परंतु या 35 वर्षात तुम्हाला 12% चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळून या रकमेचे 60 लाख 75 हजार 279 रुपये होतात.

अशाप्रकारे तुम्ही गुंतवलेली एकूण रक्कम व त्यावर मिळालेले चक्रवाढ व्याजाचा लाभ असे एकत्रित मिळून 64 लाख 95 हजार 279 रुपये तुम्हाला मिळू शकतात. जर आपण आर्थिक तज्ञांचे मत पाहिले तर एसआयपीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास सरासरी परतावा 12 टक्क्यांपर्यंत मिळू शकतो.

याशिवाय कधीकधी व्याज 15 ते 20 टक्क्यांपर्यंत देखील जाऊ शकते. इतका व्याजाचा लाभ इतर कोणत्याही योजनेमध्ये मिळत नाही.म्युच्युअल फंड एसआयपी ही योजना बाजाराशी जोडलेली आहे. त्यामुळे बाजारात असलेली जोखीम यामध्ये असते.

परंतु  गेल्या काही वर्षाची आकडेवारी पाहिली तर म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये लोक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायला लागले आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे एका महिन्याला एक हजार रुपयाची गुंतवणूक अगदी कोणीही सहजपणे या योजनेत करू शकतो.

Ajay Patil