आर्थिक

Investment Plan : दररोज 100 रुपये वाचवून व्हा करोडपती, अशाप्रकारे करा नियोजन !

Published by
Ahmednagarlive24 Office

Investment Plan : प्रत्येक व्यक्तीचे करोडपती बनण्याचे स्वप्न असते, पण प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होईलच असे नाही. पण जर तुम्ही पैशांचे योग्य नियोजन केले तर तुम्ही नक्कीच तुमचे हे स्वप्न पूर्ण करू शकता. करोडपती होण्यासाठी पैशांची योग्य गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे, बाजारात सध्या अनेक योजना आहेत, ज्या तुम्हाला भविष्यात करोडपती बनवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत.

जर तुम्ही दररोज पैसे थोडे वाचवले आणि ते योग्य ठिकाणी गुंतवले तर तुम्ही मोठा फंड तयार करू शकता. जर तुम्हाला शेअर बाजारात पैसे गुंतवून धोका पत्करायचा नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करू शकता. यामध्ये SIP करून बचत करू शकता.

जर तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. तुम्हाला दररोज फक्त 100 रुपये वाचवावे लागतील आणि SIP द्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवावे लागतील. SIP चा परतावा हा वार्षिक 12 टक्के आहे. अशास्थितीत तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक केली तर नक्कीच तुम्ही तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.

अशा प्रकारे करा गुंतवणूक

तुम्हाला दररोज 100 रुपये वाचवावे लागतील. जर तुम्ही दररोज 100 रुपये वाचवले तर ते एका महिन्यात 3000 रुपये होईल. हे पैसे तुम्हाला म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे जमा करावे लागतील. तुम्हाला ही गुंतवणूक 30 वर्षे दररोज करावी लागेल.

एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, अशा प्रकारे तुम्ही 30 वर्षांत 10 लाख 80 हजार रुपये गुंतवाल. आता तुम्ही सरासरी १२ टक्के परतावा लागू केल्यास तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर ९५ लाख ९ हजार ७४१ रुपयांचा परतावा मिळेल. अशा प्रकारे, 30 वर्षांत तुमचा एकूण निधी 1 कोटी 5 लाख 89 हजार 741 रुपये होईल आणि तुम्ही करोडपती व्हाल.

Ahmednagarlive24 Office