Investment Scheme : जर तुम्ही महिन्याला कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक केली तरी तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकते. तुम्ही यातून लाखोंचा निधी सहज उभारू शकता. विशेष म्हणजे सध्या अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्हाला लाखोंचा परतावा मिळत आहे.
त्यापैकी एक योजना म्हणजे महिला सम्मान बचत पत्र योजना होय. हे लक्षात घ्या की महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा उद्देश या योजनेमागचा आहे. तुम्हीही यात गुंतवणूक करून लाखो रुपये कमावू शकता. जाणून घ्या सर्वकाही.
या योजनेची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अल्पवयीन मुलीच्या वतीने तिच्या पालकांना या योजनेत गुंतवणूक करता येत नाही. समजा तुम्हाला या योजनेत कमीत कमी 1000 रुपयासह गुंतवणूक करता येते. यानंतर तुम्ही 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. या योजनेच्या जास्तीत जास्त गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही या योजनेमध्ये तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. हे लक्षात घ्या की ही योजना अवघ्या 2 वर्षांसाठी आहे. 2 वर्षानंतर तुम्हाला व्याजदरासह ठेव रक्कम मिळू शकते. ही योजना केवळ आणि केवळ भारतीय महिलांसाठी सुरू केली आहे.
किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या
गुंतवणूकदारांना सध्या या योजनेत केंद्र सरकारकडून 7.5 टक्के व्याज देण्यात येत आहे. तसेच इतर बचत योजना पाहिल्या तर त्यानुसार या योजनेत जास्त चांगले व्याज देण्यात येत आहे. आता भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी अर्ज करता येतो.
तसेच या योजनेत महिला एकापेक्षा जास्तीत जास्त खाती चालू करू शकतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की एकापेक्षा जास्त खाती उघडण्यासाठी कमीत कमी 3 महिन्यांचे अंतर ठेवणे गरजेचे आहे. आनंदाची बाब म्हणजे कोणत्याही वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.
आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची गरज असणार आहे. यात तुम्हाला आधार कार्ड, पॅनकार्ड आणि फोटो जमा करावा लागेल.
या योजनेत, 7.5 टक्के व्याजासह, तुम्हाला 2 वर्षांत 32 हजार रुपयांचे जास्तीत जास्त व्याज मिळू शकेल. महत्त्वाचे म्हणजे 2 वर्षांच्या मुदतीनंतर तुम्हाला 2.32 लाख रुपये परत मिळतील. हे लक्षात घ्या की ही योजना सुरू करण्यामागे केंद्र सरकारचा मुख्य उद्देश हा आहे की महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवणे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 14 लाख खाती उघडण्यात आली आहे. सरकारने या योजनेत एकूण 8,630 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून ही योजना जसजशी लोकप्रिय होत आहे.
हे पाहता सरकारने पोस्ट ऑफिस, सरकारी बँका तसेच अनेक खाजगी बँकांमध्ये या योजनेला सुरुवात केली आहे. बँक ऑफ इंडियाकडून आपल्या देशभरातील सर्व शाखांमध्ये या योजनेचे खाते चालू करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.