आर्थिक

Investment Scheme : ‘या’ लोकप्रिय योजनेत गुंतवा तुमचे पैसे ! मुलांचे भविष्य होईल उज्वल ; तुम्हाला होणार लाखोंचा फायदा

Published by
Ahmednagarlive24 Office

Investment Scheme : केंद्र आणि राज्य सरकारचे आज अनेक योजना आहे ज्यामध्ये तुम्ही आर्थिक गुतंवणूक करून तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर करू शकता. आज आम्ही तुम्हाला या लेखात एक भन्नाट योजना सांगणार आहोत जे सध्या लोकांमध्ये खुपच लोकप्रिय झाली असून अनेकांनी आतापर्यंत यामध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि या योजनेला बाजारातील चढ-उताराचा काहीच फरक पडत नाही यामुळे तुम्हाला अगदी आरामात सुरक्षित परतावा प्राप्त होतो. आम्ही येथे ज्या योजनेबद्दल माहिती देत आहोत ती योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची एमआयएस योजना होय. या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून मोठी कमाई करू शकतात ते अगदी सुरक्षित मार्गाने .

या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलाचे खाते उघडू शकता, जर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने हे खाते उघडले तर तुम्ही तुमच्या मुलाची फी आणि इतर खर्च सहज करू शकता. यामुळे तुमच्या मुलाचे भविष्य देखील उज्ज्वल होईल.आता आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तरपणे सांगतो.

ही मासिक गुंतवणूक योजना

योजना आहे या योजनेत तुम्ही फक्त 1,000 रुपयांमध्ये खाते उघडू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संयुक्त खाते देखील उघडू शकता. एका खात्यात 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवून तुम्हाला त्याचे फायदे मिळू लागतात. या खात्यात तुम्हाला दरमहा व्याज दिले जाते. या योजनेत गुंतवणूक करून कोणतीही भारतीय व्यक्ती याचा लाभ घेऊ शकते. या योजनेची मुदत पाच वर्षांत आहे.

मासिक गुंतवणूक योजनेतून पैसे कसे काढायचे?

तुम्ही 1 वर्ष ते 3 वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास, ठेव रकमेतून 2 टक्के वजा करून तुमचे पैसे परत केले जातात. तुम्ही 3 वर्षापूर्वी केव्हाही पैसे काढल्यास, तुमच्या ठेव रकमेच्या 1 टक्के वजा केल्यावर तुमचे पैसे परत केले जातात.

2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक

जर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने हे खाते उघडले असेल आणि तुम्ही त्याच्या नावावर 2 लाख रुपये गुंतवले असतील तर तुम्हाला 6.6% व्याज दराने दरमहा 1100 रुपये मिळतील आणि हे व्याज पाच वर्षांच्या कालावधीनंतर मिळेल. एकूण 66 हजार रुपये होतील. ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि योजनेची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच गुंतवणूक सुरू करा.

हे पण वाचा :-  Electric Cars In India : ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा देशातील सर्वाधिक रेंज देणाऱ्या ‘ह्या’ इलेक्ट्रिक कार्स; लिस्ट पाहून तुम्हीही प्रेमात पडाल

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office