आर्थिक

Investment Tips: 20 हजार रुपये पगार असलेल्या व्यक्तीला कोट्यावधी रुपये जमा करता येतात का? ‘हा’ फार्मूला करू शकतो तुमचे स्वप्न साकार

Published by
Ajay Patil

Investment Tips: गुंतवणूक ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची असून तुम्हाला जर तुमचे भविष्यकालीन आर्थिक जीवन समृद्ध पद्धतीने जगायचे असेल तर गुंतवणुकी शिवाय पर्याय नाही. तसेच गुंतवणूक करताना ती दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध व त्यात सातत्य ठेवत करत राहणे खूप गरजेचे आहे.

तुम्ही किती पैसे कमवतात? याला महत्व नसून तुम्ही कमवलेल्या पैशांमधून बचत किती करता व बचतीतून किती पैसे गुंतवता याला खूप महत्त्व आहे. तसेच तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी नेमका कोणता पर्यायामध्ये गुंतवणूक केली ही गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची असते.

साधारणपणे सध्या मुदत ठेव योजनांपासून म्युच्युअल फंड्स एसआयपी सारख्या योजनांना गुंतवणुकीसाठी प्राधान्य दिले जाते. यामध्ये एसआयपी गुंतवणुकीमध्ये थोडी जोखीम असते. परंतु यामध्ये परतावा चांगला मिळत असल्याकारणाने आता एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.

परंतु एसआयपी मध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला नियम आणि अटींचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे असते. एसआयपीमध्ये जर तुम्ही काही सिक्रेट फार्मूल्यांचा वापर करून  थोडी थोडी गुंतवणूक करत गेला तरी तुम्ही काही वर्षांनी कोट्याधीश होऊ शकता व हे शक्य आहे.

या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर तुमचा पगार दरमहिना वीस हजार असेल तरी तुम्ही  70:15:15 चा फॉर्म्युला एसआयपीत गुंतवणुकीसाठी वापरला तर तुम्ही वीस हजार पगार असताना देखील काही वर्षांनी कोट्यावधी रुपये जमा करू शकता.

 वीस हजार पगार असताना तुम्ही कोट्यावधी रुपये कसे जमा कराल?

तुम्हाला वीस हजार रुपये पगार असेल तर तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात व त्याकरिता तुम्हाला 70:15:15 चा फॉर्मुला वापरावा लागेल. हा फार्मूला अतिशय सोपा आहे व तुमच्या महिन्याच्या उत्पन्नावर अवलंबून आहे.

समजा तुम्हाला जर वीस हजार रुपये पगार आहे व तुम्ही हा फार्मूला वापरायचा ठरवला तर या फार्मूला पैकी 20000 रकमेतून तुम्हाला 70 टक्के रक्कम तुमच्या घर खर्चासाठी बाजूला ठेवणे गरजेचे राहील.

म्हणजेच 20000 मधून तुम्ही 14 हजार रुपये घर खर्चासाठी बाजूला ठेवाल. 14 हजार बाजूला काढल्यानंतर तुमच्याकडे 20 हजार पगारातील जवळपास 30 टक्के रक्कम म्हणजे सहा हजार रुपये शिल्लक राहतील.

या सहा हजार मधून तुम्ही तीन हजार रुपये एखादी इमर्जन्सी आली तर कामात येतील म्हणून बाजूला काढणे गरजेचे आहे. 3000 बाजूला काढल्यानंतर तुमच्याकडे 6000 मधून 3000 रुपये उरतील व हे तीन हजार रुपये तुम्ही चांगल्या म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवू शकता.

या पद्धतीने तुम्ही जर प्रत्येक महिन्याला एसआयपी मध्ये तीन हजार रुपये जमा केले तर एका वर्षामध्ये तुम्ही 36 हजार रुपये जमा करतात. अशाप्रकारे गुंतवणुकीमध्ये जर सातत्य ठेवत तुम्ही सलग तीस वर्षांपर्यंत एसआयपीमध्ये प्रतिमहिना तीन हजार रुपये गुंतवणूक करत गेलात तर तुमचे दहा लाख 80 हजार रुपये जमा होतात.

एसआयपी मध्ये मिळणारा परतावा पाहिला तर तो साधारणपणे वार्षिक 12 टक्के मिळतो विशेष म्हणजे यावर कंपाऊंडिंगचा म्हणजेच चक्रवाढ व्याजाचा फायदा देखील मिळतो.

यानुसार बघितले तर बारा टक्के वार्षिक परतावा दराने दहा लाख 80 हजार रुपयांच्या तुमच्या गुंतवणुकीवर तीन वर्षात तुम्हाला चक्रवाढ व्याज आणि 12% परतावा मिळून 95 लाख 9 हजार 741 रुपये व्याज मिळेल. अशाप्रकारे तुमची एकूण गुंतवणूक आणि व्याज जर एकत्र केले तर तुम्हाला एक कोटी पाच लाख 89 हजार 741 रुपये तीस वर्षात मिळतील.

अशाप्रकारे तुम्ही वीस हजार रुपये पगारांमध्ये देखील कोट्याधीश होऊ शकतात. परंतु यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीत सातत्य ठेवणे गरजेचे राहिल आणि तुम्ही जितक्या लवकरात लवकर गुंतवणूक सुरू कराल तितके तुमच्या फायद्याचे ठरते.

Ajay Patil