Investment Tips : दरमहा उत्कृष्ट परतावा मिळवायचा आहे? तर आजच करा ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक, होईल फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment Tips : अनेकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काही योजनांमध्ये तर गुंतवणूकदारांना कलम 80C अंतर्गत कर सवलत देखील मिळते. उत्तम परतावा आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या योजनांमध्ये अनेकजण गुंतवणूक करतात.

ज्येष्ठ नागरिकांसाठी काही उत्तम योजना आहेत. यात गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा दिला जात आहे. जर तुम्हालाही प्रत्येक महिन्याला उत्कृष्ट परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही काही योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. जाणून घ्या सविस्तर.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिक आता ज्येष्ठ नागरिक बचत या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्यातून त्यांना नियमित व्याज मिळेल. व्याज त्रैमासिक आधारावर देय असून ठेवीच्या तारखेपासून 31 मार्च/30 जून/30 सप्टेंबर/31 डिसेंबरपर्यंत लागू होईल. मूळ रकमेसाठी पाच वर्षांचा लॉक-इन वेळ इतका आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने चालू केलेल्या सर्व SCSS खात्यांमध्ये कमीत कमी ठेव रक्कम रु. 1,000 आणि रु. 1,000 च्या पटीत, जास्तीत जास्त मर्यादा रु. 30 लाख इतकी असणार आहे. SCSS खाते तुमच्या जोडीदारासोबत किंवा संयुक्तपणे चालू करता येते. 1 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी फक्त चेकद्वारे स्वीकारल्या जातात हे लक्षात ठेवा, ही योजना कलम 80C अंतर्गत कर सवलतीसाठी देखील पात्र आहे.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी POMIS ही आणखी एक छोटी बचत योजना असून या योजनेचा गुंतवणुकीचा कालावधी पाच वर्ष इतका आहे. सिंगल खात्यात गुंतवणुकीची जास्तीत जास्त मर्यादा 9 लाख रुपये आहे. तर संयुक्त खात्यामध्ये 15 लाख रुपये इतकी आहे. खाते चालू केल्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यावर आणि परिपक्वतेपर्यंत व्याज देय मिळेल. हे लक्षात घ्या की या योजनेमधील गुंतवणूक कोणत्याही कर लाभांसाठी पात्र नाहीत. तर व्याज पूर्णपणे करपात्र असते.

मुदत ठेव

अनेक बँका सामान्यत: विविध कालावधीच्या FD वर ऑफर केल्या जाणार्‍या सामान्य व्याजदरांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देत असतात. FD व्याज गुंतवणूकदारांना मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक अशा नियमित अंतराने दिले जाते. ठेवींच्या कालावधीच्या बाबतीत बँका लवचिकता प्रदान करत असल्याने ठराविक कालावधीसाठी फंड लॉक करण्याऐवजी, गुंतवणूकदार ‘लॅडरिंग’द्वारे रक्कम विविध मॅच्युरिटीमध्ये पसरवू शकतो.