Investment Tips : आर्थिक मंदीच्या काळात गुंतवणूक कशी करावी? हे पर्याय लक्षात ठेवा, मंदीच्या काळातही होईल चांदी


शेअर बाजारात तसेच इतर ठिकाणी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना अनेकवेळा आर्थिक मंदीचा सामना करावा लागतो. अशा वेळी या टिप्स तुम्हाला मदत करतील.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment Tips : जेव्हा आर्थिक मंदी असेल तेव्हा तुमची गुंतवणूक योग्य ठिकाणी झाली तर तुमचे नुकसान होण्यापासून वाचते. अशा वेळी गुंतवणुकीची गरज भासल्यास सर्वात योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची माहिती तुम्हाला असायला हवी आहे.

जर तुम्ही अलीकडच्या काळात विचार केला तर अनेक बँकांचे अपयश, वाढती महागाई, व्याजदरात झालेली वाढ, शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे आर्थिक मंदीचा धोका सातत्याने वाढत आहे. भारताची बाजारपेठ सध्या तेजीत आहे, परंतु परदेशी बाजारपेठेत चढ-उतार सुरूच आहेत.

तुम्हालाही यावेळी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. मंदीच्या काळात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला काय साध्य करायचे आहे? अस्थिर परिस्थितीत तुम्हाला कमीत कमी धोका पत्करायचा आहे का?

किंवा कमी किमतीमुळे यावेळी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अधिकाधिक स्टॉक्स ठेवायचे आहेत. यासाठी तुम्ही योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. दरम्यान,आज आम्ही तुम्हाला या आर्थिक गुंतवणुकीबद्दल सांगणार आहे.

येथे गुंतवणूक करणे टाळा

मंदीच्या काळात मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे टाळले पाहिजे कारण खरेदीदाराकडे मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे मालमत्तेच्या किमती कमी राहण्याची शक्यता आहे. सरकारने काळ्या पैशाला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. मालमत्तेचा बाजार हा केवळ काळ्या पैशाने चालत असे, त्यामुळे ते मंद राहण्याची शक्यता आहे.

रोख घेऊन जाणे टाळा

आर्थिक मंदीच्या काळात रोख रक्कम ठेवणे टाळा. याची दोन कारणे आहेत. पहिली म्हणजे रोख रक्कम जमा करणे धोकादायक आहे. दुसरे म्हणजे, चलनाचे अवमूल्यन होत राहते, कारण अर्थव्यवस्थेत चलनवाढ वाढते.

नफा मिळविण्यासाठी पैसे कुठे गुंतवायचे?’

आर्थिक मंदीच्या काळात तुम्हाला कमी किमतीत अनेक स्टॉक मिळू शकतात. परंतु वैयक्तिक शेअर्स खरेदी करण्याऐवजी, तुम्ही म्युच्युअल फंडातून गुंतवणूक करणे निवडू शकता. याठिकाणी केली गुंतवणूक तुमच्या खूप फायद्याची ठरेल.

सोने खरेदीसाठी गुंतवणूक करा

लोक मोठ्या प्रमाणात पैसे हे सोन्यामध्ये गुंतवत असतात. कारण सोने गुंतवणुक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. शिवाय सोन्याचे वाढते दर पाहता कालांतराने तुमहाला याचा मोठा मोबदला मिळू शकतो.

त्यामुळे महागाई आणि आर्थिक मंदीच्या काळात गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीपैकी 10 ते 15 टक्के गुंतवणूक सोने किंवा चांदीमध्ये ठेवावी, असे आर्थिक सल्लागार सुचवतात.

रोख व्यवहार करणे

आर्थिक मंदीच्या काळात गुंतवणूकदार फिक्स्ड इन्कम इन्व्हेस्टमेंट (बॉन्ड्स) मध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये नियमित उत्पन्न असून कोणताही धोका नाही. तसेच, लाभांश ईटीएफमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही बाजारातील परिस्थितीमुळे होणारे नुकसान कमी करता.