Investment tips : अलीकडच्या काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. प्रत्येक वेळेस शेअर मार्केटमध्ये फायदा होतोच असे नाही. अनेकदा शेअर मार्केटमध्ये तोटा देखील सहन करावा लागतो.
मार्केटमध्ये असे काही शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर दहापट परतावा देतात. परंतु जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी वाचाच. कारण तुमची एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते.
खरतर शेअर बाजारातील गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला जोखीम घ्यावी लागते. तुम्हाला धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे परंतु त्यात तोटादेखील आहे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी
वास्तविक शेअर मार्केटमध्ये बऱ्याच वेळा पैसे बुडतात आणि व्यावसायिकांना धक्का बसतो, परंतु शेअर मार्केटमध्ये तोटा कसा होतो हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या एका चुकीच्या क्लिकने, एक चुकीचे बटण दाबले गेले की लाखो-करोडो रुपये वाया जातात.
फॅट फिंगर ट्रेडिंग
शेअर मार्केटच्या जगात ही चूक ‘फॅट फिंगर ट्रेडिंग’ म्हणून ओळखण्यात येते. तुम्ही जर चुकीचे बटण दाबल्याने किंवा चुकीचे क्लिक केल्याने व्यवहारावर परिणाम होत असतो. ही चूक घाईमुळे किंवा घाबरल्यामुळे, इंटरनेट कनेक्शनमुळे किंवा डिव्हाइसमधील बिघाडामुळे देखील येऊ शकते.
संयम बाळगा
ही चूक टाळण्यासाठी, गुंतवणूकदाराने सर्वात अगोदर त्याबद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. ट्रेडिंग करत असताना तुम्ही इंटरनेट कनेक्शन तपासले पाहिजे. अशावेळी एखाद्याने घाई करू नये किंवा घाबरू नये. कुठेही क्लिक करण्यापूर्वी लिहिलेला मजकूर किंवा विचारलेला प्रश्न तपासावा. हळू हळू गुंतवणूक सुरू करावी. तसेच पैसे गुंतवत असताना काळजी घ्या. गुंतवणूक करत असताना खूप संयम बाळगणे गरजेचे आहे.
हे लक्षात ठेवा की, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी विचारशीलता, संयम आणि लक्ष देणे खूप गरजेचे आहे. तुमची गुंतवणूकीचे योग्य निर्णय घेण्यासाठी निश्चितपणे तयारी देखील महत्त्वाची आहे. तरच तुम्हाला आर्थिक लाभ होईल. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.