Investment Tips : लवकर गुंतवणूक करणे ही चांगली सवय आहे. पण, वय कितीही असो, गुंतवणुकीची सुरुवात चांगली केली तर तुमची उद्दिष्टे नक्कीच साध्य होते. जर तुम्हाला थेट शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे नसतील तर तुम्ही म्युच्युअल फंडापासून सुरुवात करू शकता.
म्युच्युअल फंडात मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही. तुम्ही अगदी छोट्या SIP ने सुरुवात करू शकता. परंतु, जर तुम्हाला मोठा निधी हवा असेल तर तुम्हाला त्याचे सूत्र देखील समजून घ्यावे लागेल. जर तुम्ही SIPचा फॉर्म्युला समजून घेतला तर तुम्ही भविष्यात बक्कळ निधी गोळा करू शकता. आज आम्ही तुम्हाला SIPचा हाच फॉर्मुला सांगणार आहोत, चला तर मग…
गुंतवणुकीचे नियोजन कसे करावे?
जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर दीर्घकालीन धोरण उत्तम काम करते. तुमच्या उत्पन्नातून आवश्यक खर्च वजा करा आणि नंतर दररोज फक्त 100 रुपये वाचवा. ही बचत दर महिन्याला गुंतवा. पद्धतशीर गुंतवणूक योजना तुमच्या पैशाला योग्य दिशा देईल आणि तुमचे पैसे वाढवत राहील.
इतकी करा गुंतवणूक
जर तुम्हाला भविष्यात मोठा फंड हवा असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या 30 व्या वर्षी 3000 रुपयांची गुंतवणूक केली आणि 30 वर्षे नियमित गुंतवणूक केली तर एक मोठा फंड तयार होईल. इक्विटी म्युच्युअल फंडाच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर आहे.
गुंतवणुकीचा सोपा फंडा
जर मोठा निधी हवा असेल तर म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला 30 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये जर तुम्हाला अंदाजे 15% परतावा मिळाला तर तुमचा लक्षाधीश होण्याचा मार्ग सोपा होईल. येथील गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चक्रवाढ. म्हणजे, तुम्हाला 30 वर्षांत 15% सह चक्रवाढ व्याजाचा देखील लाभ मिळेल. परंतु, सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वात अचूक सूत्र, जे SIP मधील मूल्य वाढवेल. हा फॉर्म्युला स्टेप अप एसआयपीचा आहे. तुम्हाला फक्त दर वर्षी 10% चा स्टेप-अप रेट राखायचा आहे.
समजा तुम्ही 30 वर्षांचे आहात. आणि दररोज 100 रुपये वाचवले आणि SIP मध्ये गुंतवले आणि ही गुंतवणूक सलग 30 वर्षे केली, यामध्ये तुम्हाला दरवर्षी 10% स्टेप-अप करत राहावे लागेल. म्हणजे जर तुम्ही 3000 रुपयांपासून सुरुवात केली असेल तर तुम्हाला पुढील वर्षी 300 रुपयांनी ती रक्कम वाढवावी लागेल. अशास्थितीत 30 वर्षांनंतर तुमची मॅच्युरिटी रक्कम 4,17,63,700 रुपये असेल. SIP कॅल्क्युलेटरनुसार, 30 वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक 59,21,785 रुपये असेल. परंतु, येथे केवळ रिटर्नमधून 3 कोटी 58 लाख 41 हजार 915 रुपयांचा नफा होणार आहे. अशा प्रकारे, सर्वात अचूक फॉर्म्युला स्टेप-अपच्या मदतीने, तुमच्याकडे 4 कोटी 17 लाख रुपयांचा मोठा निधी असेल.