FD Rate Hike : नुकतेच ICICI बँक आणि फेडरल बँकेने त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकांनी ही वाढ बल्क FD वरील व्याजदरात केली आहे. बँक आता 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या FD वर अधिक व्याज देत आहे. नवीन दर 8 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत.
बँक आता जास्तीत जास्त 7.40 टक्के वार्षिक व्याज देत आहे. त्याच वेळी, फेडरल बँक जास्तीत जास्त 8 टक्के वार्षिक दराने व्याजदर ऑफर करत आहे. फेडरल बँकेचे नवे व्याजदर 6 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. दोन्ही बँकांचे व्याजदर पुढीलप्रमाणे :-
ICICI बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची बल्क एफडी ऑफर करत आहे. बँक 1 वर्ष ते 389 दिवसांत परिपक्व होणाऱ्या बल्क एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे. बँक या कालावधीच्या FD वर सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.40 व्याज देत आहे.
तसेच फेडरल बँक सामान्य नागरिकांना 500 दिवसांच्या एफडीवर 7.50 टक्के व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के व्याज देत आहे.
आयसीआयसीआय बँकेचे एफडीदर
ICICI बँक आता सर्वसामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 14 दिवस आणि 15 ते 29 दिवसांच्या FD वर 4.75 टक्के व्याज देत आहे. 30 ते 45 दिवसांच्या FD वर 5.50 टक्के व्याज देत आहे. ग्राहकांना 46 ते 60 दिवसांच्या FD वर 5.75 टक्के व्याज मिळत आहे.
61 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 6 टक्के, 91 दिवस ते 120 दिवसांच्या एफडीवर 6.50 टक्के, 121 दिवस ते 150 दिवस आणि 151 ते 184 दिवसांसाठी 6.50 टक्के, 185 दिवस ते 210 दिवस आणि 211 दिवस ते 270 दिवसांसाठी 6.75 टक्के बँक टक्के व्याज देत आहे.
271 ते 289 दिवसांच्या FD वर बँक 6.85 टक्के व्याज देत आहे. ICICI बँक सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्ष ते 389 दिवसांच्या FD वर 7.40 टक्के व्याज देत आहे.
फेडरल बँकचे एफडीदर
तुम्ही फेडरल बँकेत 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी FD मिळवू शकता. बँकेने 500 दिवसांसाठी व्याजदर सामान्यांसाठी 7.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8 टक्के केला आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे.
फेडरल बँक 7 ते 29 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर ग्राहकांना 3 टक्के आणि 30 ते 45 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर 3.25 टक्के व्याज देत आहे.
ग्राहकांना 46 दिवस ते 60 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या FD वर 4.00 टक्के वार्षिक व्याज आणि 61 दिवस ते 119 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या FD वर 4.75 टक्के वार्षिक व्याज मिळेल.
120 ते 180 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर 5 टक्के, 181 दिवस ते 270 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या FD वर 5.75 टक्के, 271 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या FD वर 6 टक्के आणि 1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर 6.80 टक्के व्याजदर बँक देईल.