आर्थिक

शेअर मार्केट मधील गुंतवणूकदार बनणार मालामाल, ‘हे’ 3 स्टॉक देणार 22 टक्क्यांपर्यंत रिटर्न, तज्ञांनी दिली बाय रेटिंग, पहा…

Published by
Ahmednagarlive24 Office

Share Market Tips : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर, शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

मात्र, शेअर बाजारातील तज्ञ नेहमीच गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सल्ला देतात. लॉन्ग टर्ममध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. आतापर्यंत अनेक स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये चांगला परतावा मिळवून दिला आहे.

दरम्यान, आज आपण फेमस ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी लॉंग टर्म साठी बाय रेटिंग दिलेल्या टॉप 3 स्टॉकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे जर तुम्हालाही लॉंग टर्ममध्ये शेअर बाजारात इन्वेस्ट करायचे असेल तर हे स्टॉक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहेत. तथापि, गुंतवणुकीपूर्वी तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे गरजेचे राहणार आहे.

मोतीलाल ओसवाल यांनी लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी सुचवलेले टॉप 3 स्टॉक्स :- Tata Consumer : हा स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार अशी आशा व्यक्त होत आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी टाटा कंझ्युमरच्या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतो असा दावा केला आहे.

यामुळे कंपनीकडून या स्टॉक साठी बाय रेटिंग देण्यात आली आहे. अर्थातच लॉन्ग टर्म साठी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सध्या हा स्टॉक 1128 रुपयांवर ट्रेड करत आहे. पण भविष्यात हा स्टॉक १३७० रुपयांपर्यंत पोहोचणार असा दावा ब्रोकरेज फर्मने केला आहे. म्हणजेच या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 21 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळू शकतात.

कमिन्स इंडिया : Cummins India हा देखील स्टॉक लॉंग टर्म मध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावात मिळवून देऊ शकतो. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी कमिन्स इंडियावर विश्वास दाखवला असून हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

या स्टॉक ला बाय रेटिंग देण्यात आली असून हा स्टॉक भविष्यात 2910 रुपयांपर्यंत पोहोचणार असा अंदाज आहे. सध्या हा स्टॉक 2600 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 12 टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळू शकणार आहे.

अपोलो टायर्स : ही भारतातील एक नामांकित टायर मेकर कंपनी आहे. या कंपनीच्या स्टॉक्सवर देखील तज्ञांनी विश्वास दाखवला आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी अपोलो टायर्सच्या स्टॉकसाठी बाय रेटिंग दिली आहे.

म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भविष्यात हा स्टॉक 620 रुपयांवर पोहोचणार असा अंदाज आहे. सध्या हा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 509 रुपयांवर ट्रेड करत आहे. अर्थातच तज्ञांचा जर अंदाज खरा ठरला तर या स्टॉक मधून 22 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळवता येणे शक्य होणार आहे.

Ahmednagarlive24 Office