आर्थिक

गुंतवणुकीवर 453 टक्क्यांचा परतावा देणारा ‘या’ शेअरमध्ये घसरण! आता आली फायद्याची अपडेट; गुंतवणूकदारांना होईल फायदा

Published by
Ratnakar Ashok Patil

IRFC Share Price:- गेल्या दोन दिवसापासून भारतीय शेअर मार्केटमध्ये तेजीचे वातावरण दिसून येत असून सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले व त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. या सगळ्या तेजीच्या वातावरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून ज्या शेअरमध्ये घसरण होत होती अशा शेअरमध्ये देखील तेजी पाहायला मिळत आहे.

अगदी याचप्रमाणे आज इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली व या मागील जर प्रमुख कारण बघितले तर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अर्थात आयआरएफसी कंपनीबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे

व या अपडेटनुसार बघितले तर या कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली की, कंपनीने झारखंड मधील लातेहार जिल्ह्यातील कोळसा ब्लॉकला वित्तपुरवठा करण्यासाठी सर्वात कमी बोली लावली आहे व या अपडेट नंतर मात्र या कंपनीच्या शेअरवर चांगले परिणाम पाहायला मिळाले.

कसा होता आयआरएफसी शेअरचा परफॉर्मन्स?
मंगळवारी बघितले तर या कंपनीच्या शेअरमध्ये 5.72% ची वाढ पाहायला मिळाली व या वाढीसह हा शेअर 135.75 रुपयांवर पोहोचला होता.

जर आपण या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी पाहिली तर ती 229 रुपये होती व निचांकी पातळी 116.65 रुपये होती.या आकडेवारी वरून जर बघितले तर हा शेअर त्याच्या विक्रमी पातळीवरून 69 टक्क्यांनी घसरला आहे.

तीन वर्षात आयआरएफसी शेअरने दिलेले रिटर्न
गेल्या आठवड्यात आयआरएफसी कंपनीच्या शेअरमध्ये 4.08 टक्क्यांची घसरण झाली आहे व एका महिन्यात 13.70% घसरला असून गेल्या सहा महिन्याच्या अनुषंगाने बघितले तर या शेअरच्या किमतीत तब्बल 36.59 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली आहे.

एका वर्षाच्या कालावधीसाठी देखील या शेअरची कामगिरी इतकी चांगली राहिलेली नसून या शेअरने एक वर्ष कालावधीत फक्त 5.43 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर गेल्या दोन वर्षात मात्र या शेअरने 300 टक्क्यांचा परतावा दिला असून तीन वर्षात 453% परतावा दिला आहे.

कंपनीला मिळणार 3167 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे की, झारखंड मधील लातेहार जिल्ह्यातील बनहारडीह कोळसा ब्लॉगच्या विकासासाठी लागणारा 3167 कोटी रुपयांचा वित्त पुरवठा ही कंपनी करणार आहे व आरआयएफसी कंपनी झारखंड सरकारच्या टेंडरकरिता सर्वात कमी बोली लावणारी कंपनी देखील ठरली आहे.

हा कोळसा ब्लॉक प्रकल्प पत्रतू विद्युत उत्पादन निगम लिमिटेडच्या माध्यमातून बांधला जात आहे व पत्रतू विद्युत उत्पादन निगम लिमिटेड हा एनटीपीसी लिमिटेड आणि झारखंड बिजली वितरण निगम लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम आहे.

Ratnakar Ashok Patil

Published by
Ratnakar Ashok Patil