आर्थिक

जमिनीची रजिस्ट्री खरी की खोटी? प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी कसे ओळखाल? जाणून घ्या ट्रिक

Published by
Ratnakar Ashok Patil

Property Buying Tips:- कुठल्याही प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार हा तसा संवेदनशील विषय असून यामध्ये बऱ्याच गोष्टींची काळजी घेऊन व्यवहार पूर्ण करणे गरजेचे असते. मग तुम्ही जमीन घेत असाल किंवा एखादा फ्लॅट किंवा प्लॉट घेत असाल अशा सर्व प्रॉपर्टीच्या व्यवहारांमध्ये काळजीपूर्वक व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण करणे हे आपल्या फायद्याचे ठरते व याकरिता तुम्ही काही महत्त्वाची कागदपत्रे तपासून घेऊनच व्यवहाराला पुढे नेणे हे फायद्याचे असते.

आपण पाहतो की देशामध्ये अनेक जमिनींच्या खरेदी विक्रीमध्ये घोटाळे आणि फसवणुकीच्या घटना झाल्याचे दिसून येते. यातील बरेच घोटाळे हे रजिस्ट्री संबंधी असतात. यामध्ये जे व्यक्ती फसवणूक करणारे असतात ते एकाच प्रॉपर्टीची पुन्हा पुन्हा रजिस्ट्री करून एकापेक्षा जास्त लोकांना या माध्यमातून फसवत असतात.

त्यामुळे तुम्हाला जर अशा पद्धतीने एखाद्या व्यवहारांमध्ये तुमची फसवणूक होऊ नये असे वाटत असेल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणे खूप गरजेचे आहे. याकरिता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खऱ्या आणि बनावट रजिस्ट्री मधील फरक तुम्हाला कळायला हवा.

आपल्याला माहित आहे की प्रॉपर्टीच्या व्यवहारांमध्ये मालमत्ता जेव्हा खरेदी केली जाते त्यानंतर त्या प्रॉपर्टीची मालकी संबंधित विक्रेत्याकडून खरेदीदाराच्या नावाने हस्तांतरित होते व या हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला रजिस्ट्री म्हणतात.

जमिनीच्या म्हणजेच प्रॉपर्टीच्या रजिस्ट्रीच्या संबंधित असलेले फसवणुकीचे जर प्रकार पाहिले तर त्यामध्ये एका जमिनीची दोनदा म्हणजेच दुहेरी रजिस्ट्री, सरकारी जमिनीची रजिस्ट्री,

एकदा प्रॉपर्टीचे प्रलंबित काही विषय असतील तर अशा प्रलंबित जमीन प्रकरणाची रजिस्ट्री आणि कर्ज गहाण ठेवलेल्या जमिनीची रजिस्ट्री अशाप्रकारे काही फसवणुकीचे प्रकार या माध्यमातून घडतात.

फसवणूक होऊ नये म्हणून काय तपासावे?
तुम्हाला जर जमिनीच्या रजिस्ट्री मधील फसवणूक होऊ नये असं वाटत असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही संबंधित जमीन किंवा प्रॉपर्टीची नवीन आणि जुनी अशा दोन्ही पद्धतीची रजिस्ट्री पहावी.

जी व्यक्ती तुम्हाला प्रॉपर्टी किंवा जमीन विकत आहे त्याने ती जमीन दुसऱ्याकडून विकत घेतली असेल तर त्या व्यक्तीला त्या जमिनीची रजिस्ट्री करून घेण्याचा कायदेशीर अधिकार होता का? याकरिता खतावणी तपासणे गरजेचे आहे. जर तुम्हाला या संबंधीची कागदपत्रे समजत नसतील तर तुम्ही कायदेशीर तज्ञांचा सल्ला घेऊन ते तपासावेत.

एकत्रीकरण रेकॉर्ड 41-45 तपासा
यामध्ये एकत्रीकरणाचे 41 आणि 45 अभिलेख जरूर पहावे. हे अभिलेख जर तुम्ही बघितले तर संबंधित जमीन किंवा प्रॉपर्टी कोणत्या श्रेणीचे आहे हे तुम्हाला कळते. म्हणजे संबंधित जमीन सरकारी तर नाही ना किंवा तुम्हाला जो व्यक्ती जमीन विकत आहे त्याच्या नावावर चुकून तर झालेली नाही ना या बाबी तुम्हाला तपासता येतात.

41 आणि 45 अभिलेखावरून तुम्हाला संबंधित प्रॉपर्टीची म्हणजे जमिनीची खरी स्थिती समजते. म्हणजे ती जमीन सरकारची किंवा वनविभागाची किंवा रेल्वेचे आहे का याविषयी देखील तुम्हाला माहिती मिळू शकते. कुठल्याही जमिनीची ही सर्वात महत्त्वाची नोंद असते.

जमिनीवर काही वाद आहेत का त्याची माहिती घ्या
बऱ्याचदा अनेक वेळा मृत्युपत्र किंवा दुहेरी रजिस्ट्रीचे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित असतात किंवा इतर काही वाद देखील असतात. म्हणून तुम्ही जर जमीन खरेदी कराल तेव्हा त्यावर एखादी तक्रार किंवा प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित तर नाही ना हे एकदा तपासून घ्यावे. जर तुम्हाला तपासायचे असेल तर तुम्ही तहसीलमध्ये असलेला जमिनीचा डेटा क्रमांक वरून आणि जमीन मालकाच्या नावावरून तपासू शकतात.

जमीन गहाण वगैरे तर ठेवलेली नाही ना?
तसेच तुम्ही जी प्रॉपर्टी किंवा जमीन खरेदी करत आहात त्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज तर नाही ना? हे तपासणे खूप गरजेचे आहे व जो व्यक्ती तुम्हाला जमीन विकत आहे ती जमीन प्रत्यक्षात त्याच्या ताब्यात आहे का नाही हे देखील तपासणे गरजेचे आहे.

Ratnakar Ashok Patil

Published by
Ratnakar Ashok Patil