ITR Refund : तुमच्याही खात्यात अजून ITR रिफंडचे पैसे आले नाहीत? तर आत्ताच करा ‘हे’ काम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ITR Refund : आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 ही होती. ज्या लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला आहे केवळ त्यांच्याच खात्यात रिटर्नचे पैसे येत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वीच्या तुलनेत आयकर विभागाकडून कर विवरणपत्रे पाठवण्याची प्रक्रिया वेगवान करत आहे.

समजा तुम्ही आयटीआर दाखल करू शकला नसाल, तर तुम्हाला आता तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. समजा तुमच्या आयटीआर रिफंडचे पैसे खात्यात आले नसतील तर लवकरात लवकर एक काम करा. तुमच्या खात्यात पैसे येतील.

अनेकांच्या खात्यात आयटीआर रिफंडचे पैसे अगोदरच आले आहेत, तर काही लोक अजूनही त्यांच्या आयटीआर परताव्याच्या पैशाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभाग उरलेल्या लोकांना लवकरात लवकर आयटीआर रिफंड जारी करण्याच्या प्रयत्नात आहे.

समजा तुम्हाला अजून तुमचा ITR परतावा मिळाला नसल्यास ITR भरण्याची प्रक्रिया अजून चालू असेल तर तुमचा परतावा मिळण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. खरंतर सुधारित ITR दाखल करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो.

तर दुसरीकडे, जर तुम्ही तुमचा आयटीआर रिटर्न भरून बराच काळ लोटला असेल आणि तुम्हाला अजूनही परतावा मिळाला नसेल, तर तुम्ही तुमच्या परताव्याची स्थिती एकदा तपासून पाहिली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://incometaxindia.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. साधारणपणे, आयकर विभाग एकूण चार आठवड्यांच्या आत परताव्याची रक्कम आयकरदात्याच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करतो.

तसेच आयकर रिटर्न भरत असताना तुम्ही दिलेले बँक तपशील बरोबर आहेत की नाही हे देखील एकदा तपासून पाहणे गरजेचे आहे. तसेच, बँक खात्यात नोंदवण्यात आलेले तुमचे नाव हे तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डशी जुळते की नाही हे पाहावे. सर्वात महत्त्वाचे हे लक्षात ठेवा की ई-आयटीआर रिफंड त्यावेळी वैध मानला जातो ज्यावेळी तुम्ही त्याचे ई-व्हेरिफिकेशन योग्य प्रकारे करता.