अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-भारतामध्ये आयुर्वेदाला खूप महत्वाचे स्थान आहे. यात अनेक आजारांचे निराकरण सांगितले गेले आहे. यात असाच एक औषधी प्रकार आहे ‘यारसागुम्बा’.
अनेक तज्ञांच्या मते या बुरशीचा वापर दमा, कर्करोग, आणि इतरही अनेक आजार बरे करण्यासाठी करता येऊ शकतो. या बुरशीला ‘हिमालयन व्हायाग्रा’ या नावाने देखील ओळखले जाते. याचा अनेक प्रकारे अनेक रोगांत उपचारासाठी वापर केला जातो. एक परजीवी बुरशी, अळीवर हल्ला करून या अळीला मातीमध्ये दाबून तिचे रुपांतर एका ‘ममी’मध्ये करते.
त्यानंतर या मृत अळीच्या शिरातून बुरशी निर्माण होते, हिलाच ‘यारसागुम्बा’ म्हटले जाते. ही बुरशी हिमालयीन प्रांतामध्ये आणि तिब्बती पठारावर सापडते. हिची किंमत सोन्याहूनही अधिक आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या बुरशीच्या एका किलो ची किंमत लाखो डॉलर्स पेक्षाही अधिक आहे. गोरखा, धाधिंग, लामजुंग यांसारख्या जमातींचे लोक दूरवरून या बुरशीच्या शोधार्थ येथे येत असतात.
दररोज प्रत्येकी किमान दहा ते बारा यारसागुम्बा या लोकांना मिळतातच. एका यारसागुम्बाची किंमत साधरण ४.५ डॉलर्स इतकी असते. पण चीन, अमेरिका, ब्रिटन, जपान, थायलंड आणि मलेशिया या देशांमध्ये ही किंमत पन्नास डॉलर्स प्रती यारसागुम्बा इतकी आहे.