मुकेश अंबानीची जबरदस्त ऑफर! Jio Users साठी अमर्यादित कॉल, डेटा आणि एसएमएस फक्त ‘इतक्या’ रुपयात

रिलायन्स जिओने २०२५ मध्ये आपल्या ग्राहकांसाठी एक आकर्षक मेगाहिट ऑफर जाहीर केली आहे. ज्यामध्ये कॉल, इंटरनेट, एसएमएस आणि जिओ टीव्हीसह अनेक सेवा अमर्यादित स्वरूपात अतिशय परवडणाऱ्या दरात दिल्या जात आहेत.

Published on -

Jio Megahit Offer:- रिलायन्स जिओने २०२५ मध्ये आपल्या ग्राहकांसाठी एक आकर्षक मेगाहिट ऑफर जाहीर केली आहे. ज्यामध्ये कॉल, इंटरनेट, एसएमएस आणि जिओ टीव्हीसह अनेक सेवा अमर्यादित स्वरूपात अतिशय परवडणाऱ्या दरात दिल्या जात आहेत.

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली जिओ आपल्या युजर्स करिता विविध बजेट आणि प्रीमियम प्लॅनसह नवीन आणि अधिक फायदेशीर योजना सादर करत आहे. या नव्या योजनांमध्ये ग्राहकांना मोठ्या प्रमाणात डेटा, अधिक कालावधीची व्हॅलिडीटी आणि अतिरिक्त फायदे मिळणार आहेत. जे त्यांना उत्तम डिजिटल अनुभव प्रदान करतील.

नवीन वर्षाची स्वागत योजना

नवीन वर्षाच्या स्वागत योजनेअंतर्गत २०२५ च्या खास ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेत ग्राहकांना २०० दिवसांसाठी एकूण ५०० जीबी डेटा (दररोज २.५ जीबी) मिळणार असून, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि एसएमएस सुविधाही उपलब्ध आहेत. यामुळे ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय त्यांचा दैनंदिन वापर अखंडित ठेवता येईल.

याशिवाय या योजनेसह २१५० किमतीचे पार्टनर कूपन दिले जात आहे.जे ग्राहकांना विविध खरेदी आणि प्रवास व्यवहारांवर भरघोस सूट मिळवून देतील. ही योजना विशेषतः दीर्घकालीन डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.

जिओचे एक वर्षाचे उत्तम व्हॅलिडीटी प्लॅन

जिओने वार्षिक प्लॅनमध्ये आकर्षक पर्याय दिले आहेत. ३,५९९ च्या वार्षिक प्लॅनमध्ये ३६५ दिवसांची वैधता असून ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा (अमर्यादित ५जी डेटा), अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. यासोबतच JioTV, JioCloud आणि JioCinema यांसारख्या अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस दिला जातो.

मात्र या प्लॅनमध्ये फॅनकोड सबस्क्रिप्शन समाविष्ट नाही. दुसरीकडे ३,९९९ च्या वार्षिक प्लॅनमध्ये वरील सर्व सेवा मिळण्यासोबत JioTV मोबाइल अ‍ॅपद्वारे फॅनकोड सबस्क्रिप्शनचा अतिरिक्त फायदा मिळतो. या योजनांमुळे ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याची गरज राहत नाही आणि दीर्घकालीन कनेक्टिव्हिटी कायम राहते.

याशिवाय जिओने १.५ जीबी/दिवस, २ जीबी/दिवस आणि ३ जीबी/दिवस डेटा पॅकेजेसही सादर केले आहेत. कमी डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हे प्लॅन उत्तम पर्याय ठरू शकतात.कारण ते त्यांच्या बजेटमध्ये राहून जिओच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. यामुळे प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतात.

काय आहे या मेगाहिट ऑफरचा उद्देश?

मुकेश अंबानी यांच्या या मेगाहिट ऑफर्सचा मुख्य उद्देश म्हणजे जिओला बाजारातील सर्वोत्तम सेवा प्रदाता म्हणून प्रस्थापित करणे आणि ग्राहकांना उत्कृष्ट सुविधा किफायतशीर दरात पुरवणे हा आहे.या योजनांमधील दीर्घकालीन वैधता, अमर्यादित सेवा आणि अतिरिक्त लाभ यामुळे ग्राहकांना वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता राहत नाही.

फॅनकोड सबस्क्रिप्शन आणि पार्टनर कूपनमुळे ग्राहकांना मनोरंजन आणि बचतीचा दुहेरी फायदा मिळतो. यासोबतच जिओच्या प्रगत नेटवर्क सुविधांमुळे ग्राहकांना जलद इंटरनेट आणि अखंडित कनेक्टिव्हिटीचा लाभ घेता येईल. या सर्व कारणांमुळे जिओच्या नवीन योजनांना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe