आर्थिक

Jio च्या ग्राहकांसाठी धक्कादायक अपडेट! हे दोन महत्त्वाचे प्लॅन बंद, पुढे काय?

Published by
Ratnakar Ashok Patil

Jio Recharge Plan:- रिलायन्स जिओने त्यांच्या दोन लोकप्रिय आणि स्वस्त प्रीपेड प्लॅन बंद केले आहेत.यामुळे कमी खर्चात कनेक्शन सक्रिय ठेवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. १८९ रुपये आणि ४७९ रुपये किमतीचे हे प्लॅन वेबसाइट आणि अॅपवरून हटवण्यात आले असून कंपनीने यामागचे अधिकृत कारण दिलेले नाही.

काय होते हे प्लॅन आणि त्यांचे फायदे?

१८९ रुपयांचा प्लॅनमध्ये (पूर्वी १५५ रुपये) २८ दिवसांची वैधता,२GB हाय-स्पीड डेटा,अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा लाभ मिळत होता. तसेच ४७९ रुपयांचा प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता,६GB हाय-स्पीड डेटा
अमर्यादित कॉलिंग आणि १००० एसएमएसचा लाभ देण्यात येत होता.

प्लॅन बंद करण्यामागील संभाव्य कारण

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) अलीकडेच नवीन नियम लागू केले आहेत. ज्याअंतर्गत फक्त कॉल आणि एसएमएससाठी स्वतंत्र टॅरिफ प्लॅन सादर करण्याचा आदेश दिला आहे. या नियमांनुसार जिओने हे प्लॅन बंद केले असण्याची शक्यता आहे.

एअरटेलनेही केले मोठे बदल

भारती एअरटेलने देखील अशा प्रकारचे बदल करत ४९९ आणि १,९५९ रुपयांचे नवीन प्लॅन सादर केले होते. मात्र कंपनीने हे प्लॅनही त्यांच्या वेबसाइटवरून हटवले आहेत आणि आता नवीन योजनांची माहिती उपलब्ध करून दिली आहे.

ग्राहकांसाठी नवीन पर्याय कोणते?

जिओकडून नवीन पर्याय जाहीर झालेला नसला तरी, ग्राहकांना आता महागडे प्लॅन निवडावे लागणार आहेत.TRAI च्या नव्या नियमानुसार कंपन्या केवळ कॉल आणि एसएमएससाठी स्वतंत्र प्लॅन आणू शकतात व त्यामुळे भविष्यात जिओही नवे प्लॅन सादर करू शकते.

तुमच्या जिओ कनेक्शनवर याचा काय परिणाम होईल?

जर तुम्ही १८९ किंवा ४७९ रुपयांचे प्लॅन वापरत असाल तर आता तुम्हाला महागडे रिचार्ज करावे लागतील. त्यामुळे नवीन प्लॅन येईपर्यंत ग्राहकांनी अधिक माहिती मिळवून निर्णय घ्यावा.

Ratnakar Ashok Patil