Top Jio Recharge Plan:- भारतामध्ये प्रमुख टेलिकॉम कंपनीच्या यादीमध्ये रिलायन्स जिओ ही कंपनी अग्रस्थानी आहे व त्यानंतर एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्यांचा क्रमांक लागतो. भारतामध्ये प्रामुख्याने जिओ वापरकर्ते जास्त प्रमाणात असल्याचे आपल्याला दिसून येतात व इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेमध्ये जिओचे रिचार्ज प्लान हे स्वस्त असल्याचे दिसून येते.
रिलायन्स जिओच्या माध्यमातून उत्तम असे आकर्षक डेटा पॅक तसेच उत्तम असे रिचार्ज प्लान व त्यामध्ये मिळणाऱ्या डेटा या दृष्टिकोनातून अनेक रिचार्ज प्लान्स खूप आकर्षक असल्याने ग्राहकांना देखील याचा फायदा होतो.
त्यामुळे तुम्ही देखील जिओ युजर्स असाल तर जिओचे दोन रिचार्ज प्लान अतिशय महत्त्वाचे असून यामध्ये युजरला दोनशे दिवस ते 365 दिवस म्हणजेच एक वर्षाची व्हॅलिडीटी मिळते
व त्यासोबतच 2.5 जीबी डेटा पर डे तसेच अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग इत्यादी अनेक सुविधा या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळतात. त्यामुळे तुम्ही तुमची गरज व आवश्यकतेनुसार दोघींपैकी कुठल्याही एका प्लॅनची निवड करू शकतात.
जिओचे हे दोन रिचार्ज प्लान आहेत फायद्याचे
1- जिओचा 2025 रुपयांचा रिचार्ज प्लान- हा जिओचा एक नवीनच म्हणजेच लेटेस्ट असा प्लान असून यामध्ये दोनशे दिवसांची व्हॅलिडीटी मिळते व या कालावधीत दररोज 2.5 जीबी डेटा दिला जातो. या रिचार्ज प्लानचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ज्या परिसरामध्ये 5G नेटवर सध्या उपलब्ध आहे
अशा ठिकाणी असलेल्या युजर्सला अनलिमिटेड 5G डेटा मिळतो. याशिवाय दररोज शंभर एसएमएस फ्री देण्यात आले आहेत. तसेच देशातील कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करण्याची सुविधा मिळते व इतकेच नाही तर जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा ॲक्सेस देखील युजर्सला फ्री मिळतो.
2- जिओचा 3599 रुपयांचा रिचार्ज प्लान- जिओचा हा रिचार्ज प्लॅन देखील ग्राहकांसाठी अतिशय फायदेशीर असून जर का तुम्ही 3599 रुपयांनी रिचार्ज केले तर तुम्हाला 365 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. या कालावधीमध्ये इंटरनेट करिता युजर्सला दररोज 2.5GB डेटा मिळतो व विशेष म्हणजे यामध्ये ज्या परिसरात 5G नेटवर्क उपलब्ध आहे अशा ठिकाणी अनलिमिटेड 5G डेटा मिळतो.
इतकेच नाही तर या प्लानमध्ये दररोज शंभर एसएमएस फ्री मिळतात व युजर्स देशातील कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. त्यासोबतच या रिचार्ज प्लानवर जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा एक्सेस बिलकुल मोफत मिळतो. याकरिता तुम्हाला कुठलाही अतिरिक्त खर्च करण्याची गरज भासत नाही.