आर्थिक

HDFC ग्राहकांसाठी कामाची बातमी, एचडीएफसी बँकेतून 50 ग्राम सोन्यावर किती गोल्ड लोन मिळणार ? वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

HDFC Gold Loan : पैशांची अचानक गरज उद्भवली तर आपण बँकेचे दरवाजे ठोठावत असतो. पैशांची अचानक गरज भासली तर अनेकजण पर्सनल लोन घेतात. मात्र, वैयक्तिक कर्जावरील व्याजदर हे अधिक असते. यामुळे तज्ञ लोक वैयक्तिक कर्ज घेण्याऐवजी गोल्ड लोन घेण्याचा सल्ला देतात.

अशा परिस्थितीत, आज आपण एचडीएफसी बँकेकडून किती व्याजदरात गोल्ड लोन दिले जाते, या विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वास्तविक एचडीएफसी ही प्रायव्हेट सेक्टर मधील देशातील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक देशातील सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत येते.

आरबीआयने ही बँक देशातील सुरक्षित बँक असल्याची माहिती दिलेली आहे. अशा परिस्थितीत, आज आपण एचडीएफसी बँकेकडून 50 ग्राम सोन्यावर किती गोल्ड लोन मिळणार हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

HDFC Bank गोल्ड लोनवर किती व्याज आकारते ?

गोल्ड लोन बँकांच्या माध्यमातून सहजतेने ऑफर केले जाते. हे कर्ज सुरक्षित कर्जाच्या प्रकारात मोडते. याचे कारण म्हणजे गोल्ड लोन घेताना ग्राहकांना गोल्ड तारण म्हणून ठेवावे लागते. यामुळे या कर्जामध्ये रिस्क कमी असते. परिणामी ज्या लोकांचा सिबिल स्कोर कमी असतो त्यांना देखील गोल्ड लोन सहजतेने मिळते.

विशेष बाब अशी की वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत गोल्ड लोन वरील व्याजदर कमी असतो. म्हणजे जर तुमच्याकडे सोने असेल तर तुम्ही ते सोने बँकेत तारण ठेवून सहजतेने कर्ज घेऊ शकता. एचडीएफसी बँकेतुन गोल्ड लोन घेतले तर 8.50% एवढे व्याजदर आकारले जाते.

50 ग्रॅम सोन्यावर किती कर्ज मिळणार ?

जर एखाद्याकडे 50 ग्रॅम सोने असेल तर त्याला एचडीएफसी बँकेकडून किती कर्ज मिळू शकत हा महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे.

मीडिया रिपोर्टनुसार जर तुमच्याकडे 50 ग्रॅम सोने असेल तर तुम्हाला एच डी एफ सी बँक 2 लाख 9 हजार 512 रुपयांचे गोल्ड लोन ऑफर करू शकते. परंतु 22 कॅरेट सोने असले तरच एवढे कर्ज मिळणार आहे. सोन्याची शुद्धता जर कमी असेल तर कर्जाची रक्कम देखील कमी होईल.

Ahmednagarlive24 Office