SBI च्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! 35 लाखाचे होम लोन घेतल्यास किती व्याज भरावे लागणार ? पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Home Loan : आपले स्वतःचे हक्काचे एक घर असावे जिथे आपले उर्वरित आयुष्य मनमुरादपणे जगता यावे असे स्वप्न प्रत्येकाचे असते. आयुष्याची पहाट खेळण्यात, बागडण्यात आणि शिक्षणात जाते, आयुष्याची दुपार आपली कामात म्हणजे कमावण्यात जाते. यामुळे आयुष्याची संध्याकाळ तरी आनंदात जगता यावी यासाठी प्रत्येकच जण चांगल्या घराचे स्वप्न पाहत असतो.

जर तुमचेही असेच स्वप्न असेल आणि तुम्हीही घर बांधण्यासाठी गृह कर्जाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची राहणार आहे. कारण की आज आपण देशातील पब्लिक सेक्टरमधील अर्थातच सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक अर्थातच एसबीआयच्या होम लोन संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एसबीआय होम लोन साठी किती व्याज आकारते

एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार एसबीआय बँकेकडून आपल्या ग्राहकांना 8.40% या व्याजदरात गृह कर्ज ऑफर केले जात आहे. मात्र हे व्याजदर फक्त अशाच ग्राहकांना लागू राहणार आहे ज्यांचे सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक आहेत.

अर्थातच ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असेल त्यांना कमी व्याजदरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होणार आहे. दरम्यान आता आपण जर 8.40% या व्याजदरात एखाद्या ग्राहकाला 35 लाखाचे कर्ज मंजूर झाले तर त्याला किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार? या कर्जासाठी त्याला किती रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार या विषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

35 लाखाच्या होम लोनसाठी किती व्याज द्यावे लागेल

जर एखाद्या ग्राहकाला 35 लाख रुपयांचे कर्ज वीस वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध झाले तर सदर ग्राहकाला 30,153 रुपये एवढा EMI भरावा लागणार आहे. म्हणजेच, या 35 लाखाच्या कर्जासाठी व्याज म्हणून 37 लाख 36 हजार 638 रुपये भरावे लागणार आहे. म्हणजेच मूळ रक्कम आणि व्याज असे एकूण 72 लाख 36 हजार 638 रुपये भरावे लागणार आहेत.

अर्थातच सदर कर्ज घेतलेल्या व्यक्तीला 35 लाखाचे घर 72 लाख 36 हजार 638 रुपयांना पडणार आहे. त्यामध्ये प्रोसेसिंग फी चा समावेश करण्यात आलेला नाही. कर्ज घेतलेल्या व्यक्तीला प्रोसेसिंग फी म्हणून अतिरिक्त चार्जेस या ठिकाणी द्यावे लागणार आहेत.