Categories: आर्थिक

स्टेटबँकेत नोकरीची सुवर्णसंधी ; लाखोंच्या घरात असेल वार्षिक वेतन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-एचडीएफसी बँकेनंतर आता देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने नोकरीची सुवर्णसंधी आणली आहे. एसबीआयने 8500 पोस्ट काढल्या आहेत. जर आपण बेरोजगार असाल तर आपल्यासाठी ही चांगली संधी असू शकते. येथे आम्ही आपल्याला निवड प्रक्रिया तसेच अर्ज आणि त्यासाठी असणारी फी याबद्दल सांगणार आहोत.

अर्ज करण्याची मुदत:-  एसबीआय 8500 अ‍ॅप्रेंटीस पदांसाठी भरती करेल. इच्छुक लोक 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्यांची लेखी परीक्षा असेल. कोरोनामुळे मुलाखत होणार नाही. एसबीआय जानेवारी 2021 मध्ये या पदांसाठी लेखी परीक्षा घेईल.

कोण करू शकते अर्ज ?:-  एसबीआय अप्रेंटिस पदासाठी प्रत्येकजण अर्ज करू शकत नाही. यासाठी अर्जदार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. केवळ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थानमधील पदवीधरच अर्ज करू शकतात. दुसरी वयोमर्यादा देखील ठेवली आहे. 31 डिसेंबर रोजी आपण किमान 20 आणि जास्तीत जास्त 28 वर्षांचे असणे आवश्यक आहे.

फी किती आहे ?:-  अर्जाच्या फीविषयी सांगायचे तर ते 300 रुपये आहे. परंतु हे केवळ आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्यांसाठी आहे. राखीव प्रवर्गासाठी अर्ज फी शून्य आहे. या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेत जनरल/फाइनेंशियल अवेयरनेस व्यतिरिक्त इतर विषय देखील असतील त्यात क्वांटिटेटिव एप्टीट्यूड, जनरल इंग्लिश, रीजनिंग एबिलिट आणि कॉम्प्यूटर अ‍ॅप्टिट्यूड यांचा समावेश आहे. ही परीक्षा 100 गुणांची असेल.

अर्ज कसा करावा ? :- आपण एसबीआयच्या या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी आपण एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. निवड झालेल्या लोकांना पहिल्या वर्षी दरमहा 15 हजार रुपये, दुसर्‍या वर्षी प्रत्येक महिन्याला 16500 रुपये आणि तिसऱ्या वर्षात दरमहा 19000 हजार पगार रुपये दिले जातील.

कोणत्या राज्यात किती जागा ? :- गुजरात (480), आंध्र प्रदेश (620), कर्नाटक (600), मध्य प्रदेश (430), छत्तीसगढ़ (90), पश्चिम बंगाल (480), ओडिशा (400), हिमाचल प्रदेश (130), हरियाणा (162), पंजाब (260), तामिळनाडू (470), पॉण्डेचेरी (6), दिल्ली (7), उत्तराखंड (269), तेलंगाना (460), राजस्थान (720), केरळ (141), उत्तर प्रदेश (1206), महाराष्ट्र (644), अरुणाचल प्रदेश (25), आसाम (90), मणिपूर (12), मेघालय (40), मिजोरम (18), नागालँड (35), त्रिपुरा (30), बिहार (475) आणि झारखंड (200)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24