IDBI Bank : IDBI बँकेच्या स्पेशल FD मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक, फक्त 375 दिवसात करत आहे श्रीमंत

Content Team
Published:
IDBI Bank

IDBI Bank : जर तुम्ही IDBI बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँक आपल्या कोट्यावधी ग्राहकांना सध्या एक विशेष मुदत ठेव ऑफर करत आहे ज्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आता ग्राहकांकडे फक्त 10 दिवसच शिल्लक आहेत.

ग्राहक 30 जून 2024 पर्यंत IDBI बँकेच्या विशेष FD मध्ये गुंतवणूक करू शकतात. बँक तुम्हाला 375 दिवसांच्या FD वर 7.60 टक्के व्याज देत आहेत, अशास्थितीत तुम्ही येथे गुंतवणूक करून खूप चांगली कमाई करू शकता. जर तुम्हालाही कमी वेळेत अधिक परतावा मिळवायचा असेल तर या महिन्याच्या अखेरी पर्यंत यामध्ये गुंतवणूक करा. चला या योजेनबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

IDBI बँक आपल्या लाखो ग्राहकांना विशेष मुदत ठेव ऑफर करत आहे. IDBI बँक 300 दिवस, 375 दिवस आणि 444 दिवसांची विशेष FD ऑफर करत आहे. त्यावर ७.७५ टक्के व्याज देत आहे. ही विशेष योजना 30 जून 2024 पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

IDBI उत्सव विशेष 400 दिवसांची FD योजना

IDBI बँकेच्या वेबसाइटनुसार, तुम्ही उत्सव FD योजनेत 30 जून 2024 पर्यंत गुंतवणूक करू शकता. IDBI बँक नियमित ग्राहक, NRI आणि NRO ग्राहकांना 444 दिवसांच्या FD वर 7.25 टक्के दराने व्याज देत आहे. बँक गुंतवणूकदारांना ही FD मुदतीपूर्वी काढण्याची आणि बंद करण्याची परवानगी देते.

IDBI उत्सव 375 दिवसांची FD योजना

IDBI बँक 375 दिवसांच्या उत्सव FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, ते नियमित ग्राहक, NRI आणि NRO ग्राहकांना 375 दिवसांच्या FD वर 7.10 टक्के व्याज देत आहे. बँक या एफडीमध्ये मुदतपूर्व पैसे काढणे किंवा पैसे बंद करण्याचा पर्याय देखील देते.

IDBI उत्सव 300 दिवसांची FD योजना

IDBI बँक 300 दिवसांच्या उत्सव FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, ते नियमित ग्राहक, NRI आणि NRO ग्राहकांना 300 दिवसांच्या FD वर 7.05 टक्के व्याज देत आहे. या एफडीमुळे मुदतपूर्व पैसे काढता येतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News