कर्जाचा जामीनदार होण्यापूर्वी ‘हा’ नियम जाणून घ्या, मगच जामीनदार बना, नाहीतर…..

Ahmednagarlive24 office
Published:
Loan Guarantor Rule

Loan Guarantor Rule : आपल्यापैकी अनेकजण संसाराच्या गरजा भागवण्यासाठी किंवा इतर काही वैयक्तिक कारणांसाठी कर्ज घेतात. गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज असे इत्यादी कर्जाचे प्रकार असतात.

मात्र कर्ज घेताना आता बँकेच्या माध्यमातून जामीनदार देखील मागितला जातो. जामीनदार म्हणून आपल्यापैकी अनेक जणांनी फॉर्म वर सह्या केलेल्या असतील. मात्र जामीनदार हा फक्त औपचारिकता पूर्ण करण्यासाठी नसतो. जर कर्ज घेतलेल्या व्यक्तीने

कर्जाची परतफेड केली नाही तर अशावेळी कर्जदार व्यक्तीला तर बँकेकडून नोटीस पाठवली जातेच मात्र जे व्यक्ती जामीनदार असतात त्यांना देखील बँकेकडून नोटीस बजावली जात असते. यामुळे कोणीही जर कर्ज घेत असेल आणि त्या कर्जासाठी तुम्हाला जामीनदार व्हायचे असेल तर आधी ही संपूर्ण बातमी वाचा आणि त्यानंतर मग तुम्ही जामीनदार व्हायचे की नाही हे ठरवा.

जामीनदाराला फेडावं लागू शकत कर्ज

बँका किंवा कोणतीही वित्तीय संस्था बहुतेकदा हमीदाराशिवाय म्हणजे जामीनदाराशिवाय कर्ज देत नाहीत. तज्ञ लोक सांगतात की कर्जाच्या जामीनदारावर मोठी जबाबदारी असते. कर्ज घेणारी व्यक्ती जर कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ झाली तर कायदेशीररित्या जामीनदार त्याची परतफेड करण्यास जबाबदार असतो.

म्हणजे जर तुम्ही एखाद्या कर्जासाठी जामीनदार असाल आणि सदर कर्जाची कर्ज घेतलेल्या व्यक्तीने परतफेड केली नाही तर तुम्हाला त्या कर्जाची परतफेड करावी लागू शकते. याबाबत येच बँकेने देखील मोठी माहिती दिली आहे. बँकेच्या वेबसाइटवर याबाबत महत्त्वाची माहिती उल्लेखित करण्यात आली आहे.

यानुसार, गॅरेंटर ही अशी व्यक्ती असते जी दुसऱ्याचे कर्ज भरण्यास सहमत असते. जामीनदार असणे ही केवळ औपचारिकता नाही तर कर्जाची परतफेड करण्यासाठी जामीनदारही तितकाच जबाबदार असतो, जेवढा कर्ज घेणारा व्यक्ती. पण इथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा की प्रत्येक बँकेने जामीनदारांसाठी वेगवेगळे नियम तयार केलेले आहेत.

यामुळे तुम्ही कोणत्या बँकेतील कर्जासाठी जामीनदार होणारा आहात त्या बँकेचे जामीनदाराबाबतचे नियम काय आहेत हे आधी समजून घ्या आणि त्यानंतरच मग तुमचा योग्य तो निर्णय घ्या. नियमानुसार बँकेच्या माध्यमातून ज्याला कर्ज देण्यात आले आहे त्याच्याकडूनच वसुली केली जाते.

मात्र जेव्हा कर्जदार व्यक्तीकडून कर्जाची वसुली होत नाही अशावेळी जामीनदाराला देखील नोटीस बजावली जाऊ शकते. कर्जदार व्यक्ती कर्ज परतफेड न केल्याने डिफॉल्ट होतो. यासोबतच सदर कर्जदार व्यक्तिला जामीन असलेल्या जामीनदार व्यक्तीला देखील डिफॉल्ट केले जाते.

त्यामुळे जामीनदार व्यक्तीचा देखील सिबिल स्कोर डाउन होतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या कर्जासाठी जामीनदार होण्यापूर्वी तो व्यक्ती कर्ज भरण्यास समर्थ आहे की नाही हे तुम्हीच तपासा आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घ्या. नाहीतर दुसऱ्यांच्या चुकीमुळे तुम्ही देखील बँक डिफॉल्टर बनाल आणि तुम्हाला भविष्यात कर्जाची गरज पडली तर अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe