State Bank of India : SBIच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी; 31 मार्चपर्यंतच वेळ…

Content Team
Published:
State Bank of India

State Bank of India : मार्च महिना संपत आला आहे आणि या महिन्यात अनेक लोक आयकर वाचवण्यासाठी नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. जर तुम्हाला कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे काहीच दिवस शिल्लक आहे.

कारण SBI यासाठी फक्त 31 मार्च 2024 पर्यंतचाच वेळ देत आहे. SBI च्या काही खास योजना लवकरच बंद होणार आहेत, तरी उमेदवारांनी लवकरात लवकर या योजनांमध्ये गुंतवणूक करून या कर बचत योजनांचा लाभ घ्यावा. 

SBI अमृत कलश 

अमृत ​​कलश योजना ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBIची विशेष FD योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे. बँक त्यावर 7.10 टक्के व्याज देत आहे. ही SBI ची एक विशेष योजना आहे ज्यामध्ये 400 दिवसांच्या FD वर 7.10 टक्के व्याज दिले जात आहे.

बँकेच्या वेबसाइटनुसार, कोणीही अमृत कलश स्पेशल स्कीममध्ये 400 दिवसांच्या कालावधीसह गुंतवणूक करू शकतो आणि हमी परतावा मिळवू शकतो. SBI बँक नुसार, अमृत कलश एफडी गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक आणि सहामाही व्याज पेमेंट घेऊ शकतात. SBIच्या वेबसाइटनुसार, अमृत कलश FD मध्ये जमा केलेले पैसे 400 दिवसांच्या कालावधीपूर्वी काढल्यास, बँक दंड म्हणून लागू दरापेक्षा 0.50 टक्के ते 1 टक्के कमी व्याजदर वजा करू शकते.

SBI WeCare FD

SBIने अलीकडेच घोषित केले की WeCare FD योजनेतील गुंतवणुकीची अंतिम मुदत 31 मार्च 2024 पर्यंत आहे. SBI त्यांच्या WeCare FD वर ग्राहकांना सर्वोत्तम व्याज देत आहे. बँक कोणत्याही FD वर सामान्य ग्राहकापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50 अधिक व्याज देते. SBI Wecare वर 7.50 टक्के व्याज मिळत आहे. योजनेअंतर्गत, किमान 5 वर्षे आणि कमाल 10 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याची सुविधा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe