अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
गेल्या एक वर्षात मस्क यांनी दर तासाला 1.736 करोड़ डॉलर्सची अर्थात 127 कोटी रुपयांची कमाई केली. याचे कारण म्हणजे जगातील सर्वात मूल्यवान ऑटो कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये अभूतपूर्व तेजी आली आहे. तेव्हापासून ते चर्चेत आहेत. या अगोदरही ते अनेक कारणांमुळे चर्चेत राहिले आहेत.
सोशल मीडियावर तो विचित्र स्टाईलसाठीही ओळखले जातात. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की मस्क व्हॉट्सअॅप वापरत नाही. ते व्हॉट्सअॅप ऐवजी मेसेजिंग अॅप ‘Signal’ वापरतात. त्यांनी स्वतः ट्वीट करुन आपली माहिती दिली.
*एलोन मस्क विषयी काही रोचक तथ्यांबद्दल जाणून घ्या :-
जेम्स बाँडचे आहेत मालक :- टेस्लासारखी कार डिझायनर एलोन मस्क यांनी 2013 मध्ये 866,000 डॉलर च्या बदल्यात लोटस एस्प्रिट पाणबुडी कार खरेदी केली. 1977 च्या जेम्स बाँड मालिकेच्या सुपरहिट चित्रपटाच्या ‘स्पाइ हू लव्ड मी’मध्ये या कारचा प्रयोग केला गेला. मस्कने ही कार लिलावात खरेदी केली होती. नंतर मस्कने टेस्लाच्या इलेक्ट्रिक पॉवर ट्रेनसह या कारमध्ये अपग्रेड करण्याची घोषणा केली.
पुस्तक वाचण्याची आवड आहे :- मास्क यांना पुस्तक वाचण्याची आवड आहे. दिवसात ते 12 तासांपेक्षा जास्त वेळ पुस्तके वाचण्यात घालवतात. असे म्हणतात की जेव्हा ते महाविद्यालयात होते, तेव्हा ते एका दिवसाच्या जेवणावर 1 डॉलरपेक्षा कमी खर्च करायचे.