LIC Jeevan Labh : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC कडून अनेक विमा योजना चालवल्या जातात, ज्यामध्ये लोकांना विम्यासोबत गुंतवणूक करण्याचीही संधी मिळते. अशीच एक योजना म्हणजे LIC जीवन लाभ. यामध्ये पॉलिसीधारकांना बचतीसोबत विम्याचे संरक्षण देखील मिळते. आज आपण या योजनेबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, ही योजना कशी काम करते आणि याचे फायदे काय आहेत.
LIC जीवन लाभ म्हणजे काय?

LIC जीवन लाभ ही मर्यादित प्रीमियम पे, नॉन-लिंक्ड, नफ्यासह एंडोमेंट योजना आहे. यामध्ये बचतीसोबतच सुरक्षेचाही लाभ मिळतो. या योजनेच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास आणि पॉलिसीधारक पॉलिसीच्या मुदतपूर्तीपर्यंत जिवंत राहिल्यास, कंपनीकडून कुटुंबाला एकरकमी रक्कम दिली जाते. यासोबतच कर्जाची सुविधाही दिली जाते.
एलआयसी जीवन लाभ योजनेचे फायदे :-
एलआयसी जीवन लाभाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मृत्यू लाभ. जर पॉलिसी धारकाचा प्लॅनच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्या अवलंबितांना वार्षिक प्रीमियमच्या 10 पट रक्कम दिली जाते आणि मृत्यूचा लाभ आतापर्यंत भरलेल्या प्रीमियमच्या 105 टक्क्यांपेक्षा कमी असू शकत नाही. तथापि, यासाठी पॉलिसी प्रीमियम वेळेवर भरणे आवश्यक आहे.
याशिवाय, जर पॉलिसीधारक मॅच्युरिटीपर्यंत जिवंत असेल. तर मूळ विम्याच्या रकमेबरोबरच, बोनस आणि अतिरिक्त बोनसचा लाभ मिळतो. हे सर्व पॉलिसीधारकाला मुदतपूर्तीच्या वेळी एकरकमी दिले जाते.
या योजनेत आठ वर्षे ते ५९ वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती एलआयसी जीवन लाभ घेऊ शकते. पॉलिसी घेण्यासाठी, किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम घ्यावी लागेल. याला कमाल मर्यादा नाही.
वेळ आणि प्रीमियम पेमेंटच्या आधारावर ते तीन भागांमध्ये विभागले गेले आहे. पहिला – (१६/१०), दुसरा – (२१/१५) आणि तिसरा – (२५/१६). यामध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियमचा पर्याय दिला जातो.
54 लाखांचा फायदा मिळवण्यासाठी काय करावे?
25 वर्षीय व्यक्तीने 20 लाख रुपयांच्या विमा रकमेसह 25 वर्षांच्या मुदतीची योजना निवडल्यास, त्याला 16 वर्षांसाठी वार्षिक 88,910 रुपये किंवा अंदाजे 243 रुपये प्रतिदिन प्रीमियम भरावा लागेल. अशा प्रकारे, वयाच्या 50 व्या वर्षी, त्याला 54.00 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल.