LIC Pension Scheme : एलआयसीची भन्नाट योजना! फक्त एकदा करा गुंतवणूक, आयुष्यभर दरमहा मिळेल पेन्शन, पहा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Pension Scheme : देशभरातील नागरिकांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाखो नागरिकांना फायदा होत आहे. तुम्हालाही गुंतवणूक करून दरमहा पेन्शन मिळवायची असेल तर भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच तुम्ही LIC मध्ये गुंतवणूक करू शकता.

LIC कडून देशातील नागरिकांसाठी सरल पेन्शन योजना आणली आहे. या योजनेमध्ये तुम्हीही गुंतवणूक करून 40 वर्षांच्या वयापासून पेन्शन मिळवू शकता. ही पेन्शन तुम्ही आयुष्यभर दरमहा मिळवू शकता. अनेक पेन्शन योजना ६० वर्षांपासून सुरु होतात.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडून सरल पेन्शन योजना 40-80 वयोगटातील व्यक्तींसाठी आणली आहे. जर तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला लगेच ४० वर्षांपासून पेन्शन मिळू शकते.

सरल पेन्शन योजनेमध्ये तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला कोणताही प्रीमियम भरवा लागणार नाही. पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, ठेवीची रक्कम नॉमिनीला परत केली जाते. जर तुम्हाला ही पेन्शन योजना सुरु ठेवायची नसेल तर तुम्ही योजना सुरु झाल्यानंतर ६ महिन्यानंतर कधीही सरेंडर करू शकता.

एकल जीवन योजना

या योजनेद्वारे ज्या व्यक्तीने या पेन्शनसाठी प्रीमियम भरला आहे तो व्यक्ती जीवन आहे तोपर्यंत त्याला पेन्शन दिली जाईल. त्याच्या मृत्यूनंतर, गुंतवणुकीची रक्कम नॉमिनीला परत केली जाते.

संयुक्त जीवन योजना

जर तुम्ही तुमच्या पार्टनर आणि तुमच्यासाठी ही योजना सुरु केली तर तुम्ही जिवंत असेपर्यंत तुम्हाला आणि तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या पार्टनरला पेन्शन दिली जाते. जर दोघांचा मृत्यू झाला तर जमा केलेली रक्कम नॉमिनीला दिली जाते.

फ्लेक्सिबल पेन्शन पर्याय

या पेन्शन योजनेद्वारे तुम्ही एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर पेन्शन मिळवू शकता. जर 42 वर्षीय व्यक्तीने 30 लाख रुपयांची वार्षिकी खरेदी केली तर त्यांना 12,388 रुपये किंवा अंदाजे 12,400 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. या पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची कोणतीही मर्यादा नाही. मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक पेन्शन तुम्ही निवडू शकता.