एलआयसीची जबरदस्त योजना…! ‘या’ योजनेत 54 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 28 लाखांचा बोनस; तसेच आयुष्यभर मिळणार वार्षिक 48,000

Tejas B Shelar
Published:
LIC Policy

LIC Policy : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीचे वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. पण, बँकेची एफडी अन RD योजना तसेच पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान आज आपण एलआयसीच्या अशाच एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.

आज आपण ज्या योजनेची किंवा पॉलिसीची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये दर दिवशी 54 रुपयांची गुंतवणूक केल्यास म्हणजेच महिन्याकाठी 1638 रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर तब्बल 28 लाख रुपयांचा बोनस मिळणार आहे.

विशेष म्हणजे मॅच्युरिटी पिरेड संपल्यानंतर आयुष्यभर 48 हजार रुपये वार्षिक रक्कम देखील सदर गुंतवणूकदाराला दिली जाणार आहे. निश्चितच आता तुम्हाला एलआयसीच्या या पॉलिसी संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल, चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या पॉलिसी विषयी ए टू झेड माहिती.

कोणती आहे ती पॉलिसी

आम्ही ज्या योजनेबाबत अर्थातच पॉलिसी बाबत बोलत आहोत ती पॉलिसी आहे जीवन उमंग पॉलिसी. एलआयसीची ही एक लोकप्रिय पॉलिसी आहे. यामध्ये आत्तापर्यंत अनेकांनी गुंतवणूक केली आहे. याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे मॅच्युरिटी पिरेड संपल्यानंतर पॉलिसीधारकाला एक ठराविक रक्कम आयुष्यभर मिळतं असते.

28 लाखाचा बोनस मिळवण्यासाठी कितीची गुंतवणूक करावी लागणार

मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसीच्या जीवन उमंग पॉलिसीमध्ये एखाद्या व्यक्तीने त्याच्या वयाच्या 25 व्या वर्षी तीस वर्ष कालावधीच्या मुदतीकरिता महिन्याकाठी 1638 रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर त्याला 28 लाख रुपयांचा बोनस मिळणार आहे.

या व्यक्तीची पॉलिसी त्याच्या वयाच्या 55 व्या वर्षी परिपक्व होईल त्यावेळी त्याला 28 लाख रुपयांचा बोनसचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे पॉलिसीचा मॅच्युरिटी पिरेड संपल्यानंतर त्याला दरवर्षी 48 हजार रुपयाची रक्कम देखील मिळणार आहे.

ही रक्कम वयाच्या शंभराव्या वर्षापर्यंत मिळत राहणार आहे. जर समजा पॉलिसी धारकाचा मृत्यु झाला तर त्याच्या वारसाला प्रत्यावर्ती स्वरुपाचा बोनसचा लाभ दिला जातो. पण, ही बोनसची रक्कम विमाधारकांने भरलेल्या प्रिमियम रक्कमेच्या 105 टक्के पेक्षा अधिकची राहत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe