LIC Policy : करा ‘या’ योजनेत गुंतवणूक! तुम्हालाही मिळेल 54 लाखांचा फायदा, अशी करा सुरुवात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Policy : अनेकांना भारतीय आयुर्विमा महामंडळात म्हणजेच LIC गुंतवणूक करायला आवडते. कारण यात गुंतवणूक करणे हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. अशातच आता तुम्ही देखील एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही एलआयसी जीवनलाभ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता.

या योजनेमध्ये तुम्हाला दररोज 265 रुपयांच्या गुंतवणुकीवर 54 लाख रुपयांपर्यंतची मोठी रक्कम मिळवता येईल. जर तुम्ही यात गुंतवणूक करत असाल तर त्यापूर्वी योजनेचे नियम जाणून घ्या नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

ही LIC जीवन लाभ पॉलिसी आहे. खरंतर ही मर्यादित प्रीमियम पे पॉलिसी असून ती नफ्यासह एक एंडोमेंट प्लॅन देखील आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात बचतीसोबतच तुम्हाला सुरक्षितता देखील मिळत आहे. तसेच, ही योजना घेतली आणि पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला पॉलिसीची रक्कम मिळते. यासोबतच कर्जाची सुविधा देखील मिळते.

जाणून घ्या एलआयसी जीवन लाभचे फायदे

आता एलआयसी जीवन लाभ योजनेच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर त्यात मृत्यू लाभ उपलब्ध आहे. यात पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर 10 पट रक्कम परत मिळते. इतकेच नाही तर यात मृत्यू लाभ 105% पेक्षा कमी असू शकत नाही. परंतु यासाठी पॉलिसीचा हप्ता वेळेवर भरणे गरजेचे आहे.

तसेच जर पॉलिसीधारक मॅच्युरिटीपर्यंत जिवंत राहिला तर, त्याला विम्याच्या रकमेसह बोनस आणि अतिरिक्त बोनसचा लाभ दिला जातो. हे सर्व पॉलिसीधारकाच्या मुदतपूर्तीच्या वेळी देण्यात येते.

अशी करा सुरुवात

8 ते 59 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्तीला LIC जीवन लाभ घेता येते. ही पॉलिसी घेण्यासाठी, 2 लाख रुपयांची कमीत कमी विमा रक्कम उपलब्ध आहे. शिवाय यात जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही. यात प्रीमियम निवडण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. ज्यामध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर ठेवी करता येतात.

असा होईल 54 लाखांचा फायदा

समजा एखादी व्यक्ती 25 वर्षांची असल्यास तर त्या व्यक्तीला 25 वर्षांत एकूण 20 लाख रुपयांची विमा रक्कम निवडावी लागणार आहे, त्यानंतर त्याला 16 वर्षांसाठी वार्षिक 88,910 रुपये किंवा एकूण 243 रुपये दररोज जमा करावे लागणार आहेत. अशा प्रकारे वयाच्या 50 व्या वर्षी 54 लाख रुपयांचा फायदा त्या गुंतवणूकदाराला होतो.