LIC Policy : LIC ची भन्नाट योजना…! एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर मिळवा 12 हजार रुपये पेन्शन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Policy : खाजगी क्षेत्रात काम करणा-या बहुतेक नोकरदारांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न न मिळाल्याने भविष्याची काळजी वाटते. खासगी नोकऱ्यांमध्ये पेन्शन मिळत नाही. अशास्थितीत कर्मचाऱ्याने नोकरीवर असताना पेन्शन योजना किंवा निधीमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. असे अनेक लोक आहेत जे नोकरीच्या काळात पेन्शन योजना घेत नाहीत आणि निवृत्तीनंतर काळजीत असतात.

अशातच आज आपण अशा एका पेन्शन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला एकदा पैसे जमा करावे लागतील आणि तुम्हाला आयुष्यभर दरमहा 12,000 रुपये पेन्शन मिळतील. कोणती आहे ही योजना चला पाहूया…

आम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या सरल पेन्शन योजनेंबद्दल बोलत आहोत, या योजनेत दरमहा 12000 रुपये पेन्शन उपलब्ध आहे. LIC च्या सरल पेन्शन योजनेत, तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागतो. त्यानंतर, 60 वर्षांनंतर, तुम्हाला दरमहा 12000 रुपये पेन्शन मिळते. या पेन्शनचा लाभ तुम्हाला आयुष्यभर मिळतो. तुम्ही वयाच्या ६० व्या वर्षी यामध्ये १० लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला वार्षिक तुम्हाला ५८९५० रुपये मिळतील. लक्षात घ्या या योजनेत मिळणारे पेन्शन तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेवर अवलंबून असते.

या पेन्शन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही घेता येतात. या योजनेत दरवर्षी किमान 12000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही. ही योजना 40 ते 80 वयोगटातील लोकांसाठी आहे. या योजनेत, पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांनंतर कधीही कर्ज मिळू शकते.

सरल पेन्शन योजनेचे नियम

खरेदी किंमतीच्या 100 टक्के परताव्यासह जीवन वार्षिकी ही पेन्शन एकल पेमेंट पॉलिसी आहे. ही पॉलिसी एका व्यक्तीशी संबंधित असेल. जोपर्यंत गुंतवणूकदार म्हणजेच पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.