LIC Policy : एलआयसीच्या ‘या’ योजनेत सुरक्षिततेसह बंपर रिटर्नची हमी, बघा कोणती?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Policy : एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपन्यांपैकी एक आहे. LIC कडून अनेक विमा पॉलिसी ऑफर केल्या जातात. ज्यामध्ये एक LIC जीवन किरण पॉलिसी देखील आहे. एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मजबूत परतावा तर मिळतोच तसेच त्यांना सुरक्षेची हमी देखील मिळते.

एलआयसीने सुरू केलेली ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटेड वैयक्तिक बचत योजना आहे. या योजनेमुळे लोकांना मोठा फायदा होत आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूकदारांना अनेक सुविधांचा लाभ दिला जतो.

उदाहरणार्थ, पॉलिसी धारकाचा पॉलिसी कालावधी दरम्यान मृत्यू झाल्यास, कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. तर परिपक्वतेपर्यंत टिकून राहिल्यास, जमा केलेला एकूण प्रीमियम परत केला जातो. या विमा योजनेत, धूम्रपान करणारे आणि धूम्रपान न करणारे दोघांनाही विविध प्रकारचे प्रीमियम निवडण्याचा पर्याय मिळतो.

या प्लॅनमध्ये ॲक्सिडेंटल डेथ अँड डिसॅबिलिटी बेनिफिट रायडर आणि ॲक्सिडेंट बेनिफिट रायडर नावाचे दोन प्रकार आहेत. LIQI नुसार, पॉलिसीधारक अतिरिक्त प्रीमियम भरून अशा रायडर्सची निवड करू शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की रायडर ही एक तरतूद आहे जी विमा पॉलिसीमध्ये अतिरिक्त अटी जोडते किंवा त्यात सुधारणा करते.

विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास?

विमाधारकाचा पॉलिसी मुदतीच्या आत मृत्यू झाल्यास मृत्यूवर विम्याची रक्कम दिली जाईल. त्याच वेळी, वार्षिक प्रीमियमच्या 7 पट किंवा मृत्यूच्या तारखेपर्यंत जमा केलेल्या एकूण प्रीमियमच्या 105 टक्के किंवा मूळ विम्याची रक्कम दिली जाईल. एकल प्रीमियमच्या 125 टक्के किंवा त्याहून अधिक मूळ विम्याची रक्कम दिली जाईल.