आर्थिक

LIC Policy: एलआयसीचा ‘हा’ प्लान आहे लयभारी! एकदाच कराल गुंतवणूक तर मिळेल आयुष्यभर 1 लाखांची पेन्शन

Published by
Ajay Patil

LIC Policy:- गुंतवणूक आणि भविष्यकालीन जीवन यांचा खूप जवळचा संबंध असून आर्थिक दृष्टिकोनातून जर समृद्ध आर्थिक भविष्यकालीन जीवन जगायचे असेल तर तुम्हाला आतापासून गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. तुम्ही जर चांगल्या अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला परतावा चांगला मिळतो व त्यायोगे पुढचे आयुष्य सुखा समाधानात व कोणावर अवलंबून न राहता तुम्हाला व्यतीत करता येते.

याकरिता बँकांच्या योजना तसेच मुदत ठेव योजना या गुंतवणूक पर्यायांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामागील प्रमुख कारण म्हणजे या पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्यावर गुंतवणूक सुरक्षित राहतेच व परतावा देखील चांगला मिळत असतो. या दोन्ही पर्यायांशिवाय एलआयसी म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हा देखील एक गुंतवणुकीसाठीचा उत्तम पर्याय आहे.

एलआयसीच्या माध्यमातून अनेक आकर्षक अशा योजना राबवल्या जातात व यामधून तुम्हाला विमा कव्हर तर मिळतेच परंतु काही योजनांच्या माध्यमातून गुंतवणूक करून तुम्ही आयुष्यभर चांगली पेन्शनच्या स्वरूपात रक्कम मिळवू शकतात.

अगदी याच प्रमाणे तुम्हाला देखील गुंतवणूक करून दर महिन्याला उत्पन्न मिळवायचे असेल तर एलआयसीची न्यू जीवन शांती पॉलिसी खूप महत्त्वाची असून यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर खूप चांगले व्याजदर मिळतात.

 नेमकी कशी आहे एलआयसीची न्यू जीवन शांती पॉलिसी?

एलआयसीच्या न्यू जीवन शांती पॉलिसी मध्ये तुम्ही गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळवू शकतात. सेवानिवृत्तीनंतर म्हणजेच रिटायरमेंटच्या कालावधीनंतर आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला नियोजन करायचे असेल तर एलआयसीची ही योजना खूप फायद्याची ठरू शकते. कारण या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला नियमित पेन्शनची गॅरंटी दिली जाते व तुम्ही या योजनेतून एक लाख रुपयांची पेन्शन मिळवू शकतात.

या पॉलिसीमध्ये 30 ते 79 वयापर्यंतचे लोक अर्ज करू शकतात. निश्चित पेन्शनसह या योजनेमध्ये अनेक प्रकारचे इतर फायदे देखील मिळतात. एलआयसीचा न्यू जीवन शांती पॉलिसी हा एक ॲनुईटी प्लॅन असून यामध्ये एक निश्चित रक्कम तुम्हाला पेन्शन म्हणून मिळते.

समजा तुम्ही या प्लॅनमध्ये 55 व्या वर्षी 11 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला साठव्या वर्षी प्रत्येक वर्षाला साधारणपणे एक लाख 28 हजार 50 रुपयांची पेन्शन मिळते. म्हणजेच 11 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर वर्षाला एक लाख रुपये तुम्हाला मिळतात.

समजा तुम्हाला सहा महिन्यांनी हे पैसे काढायचे असतील तर तुम्हाला सहा महिन्याच्या कालावधीत 50 हजार 365 रुपये दिले जातात. तुम्हाला जर एलआयसीच्या न्यू जीवन शांती पॉलिसीमध्ये कमाल रक्कम गुंतवायची असेल तर त्याची मर्यादा नाही. म्हणजेच तुम्ही कितीही रक्कम यामध्ये गुंतवू शकतात.अशाप्रकारे निश्चित पेन्शनची रक्कम मिळवण्यासाठी एलआयसीची ही पॉलिसी खूप फायद्याची ठरू शकते.

Ajay Patil