LIC Policy : कमी गुंतवणुकीत मिळेल लाखोंचा परतावा, काय आहे LIC ची भन्नाट योजना? जाणून घ्या

Pragati
Published:
LIC Policy

LIC Policy : एलआयसी प्रत्येक वयोगातील व्यक्तींना पॉलिसी आणत असते. अशीच एक विशेष विमा पॉलिसी एलआयसीने महिलांना डोळ्यासमोर ठेवून आणली केली आहे. या भन्नाट पॉलिसीचे नाव LIC आधार शिला पॉलिसी असे आहे.

या विशेष विमा पॉलिसीमध्ये महिलांना सहज गुंतवणूक करता येते. परंतु, त्यासाठी काही अटी आहेत. 8 ते 55 वर्षे वयोगटातील महिलांना पॉलिसीचा लाभ घेता येतो. समजा आता तुम्हालाही तुमचे भविष्य जास्त सुरक्षित करायचे असल्यास तुम्ही या योजनेत सहज गुंतवणूक करू शकता.

LIC च्या या शानदार योजनेचे नाव आहे आधार शिला पॉलिसी, ज्यामध्ये पॉलिसीधारकाला एकरकमी मजबूत उत्पन्न मिळेल. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी, तुम्हाला सर्वात अगोदर काही गुंतवणूक करावी लागणार आहे. ज्याच्या परिपक्वतेवर तुम्हाला खुओ मोठी रक्कम मिळू शकेल. आता तुम्ही या योजनेत दररोज पैसे वाचवून गुंतवणूक करू शकता. कसे ते जाणून घ्या.

लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

एलआयसीची ही आधार शिला योजना प्रत्येकाच्या मनावर राज्य आहे. ही योजना एक नॉन-लिंक्ड, वैयक्तिक जीवन विमा योजना असून या योजनेची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याचा लाभ केवळ महिलांनाच मिळेल. यातील गुंतवणुकीसाठी ठराविक रक्कम निश्चित करण्यात येते. समजा पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्याचा लाभ दिला जातो.

गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की त्या महिलेचे वय 8 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावे. तुम्ही 10 वर्षे ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी पॉलिसी खरेदी करू शकता. या योजनेच्या परिपक्वतेच्या वेळी, स्त्रीचे कमीत कमी वय 70 वर्षे असू शकते. समजा जर एखाद्या महिलेने काही कारणास्तव, वयाच्या 55 व्या वर्षी या योजनेत खाते चालू केले तर 15 वर्षानंतर, त्या महिलेला 2 लाख रुपयांच्या एकरकमीतून जास्तीत जास्त 5 लाख रुपयांचा लाभ दिला जातो.

असा मिळेल लाखोंचा परतावा

LIC ची सर्वोत्तम योजनेचा जर तुम्हाला 10 लाख रुपयांचा लाभ घ्यायचा असल्यास तर तुम्हाला दररोज 87 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. हा भाग तुम्हाला प्रति वर्ष 31,755 रुपये प्रीमियम मिळवत राहील. तसेच 10 वर्षांच्या कालावधीत जमा करण्यात आलेली एकूण रक्कम 3,17,550 रुपये इतकी होईल. जर तुम्ही वयाच्या 70 व्या वर्षी योजनेचे पैसे काढले तर आता तुम्हाला सहज 11 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe