LIC Policy : घरबसल्या मिळवायचे असतील महिन्याला पैसे, तर आजच करा ‘या’ योजनेत गुंतवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Policy : अनेकजण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काही अशा सरकारी योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला लाखो रुपयांचा परतावा मिळतो. कारण या योजनांमध्ये कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही आणि परतावा देखील सुरक्षित असतो.

जर तुम्हाला घरबसल्या तुमच्या वृद्धापकाळात प्रत्येक महिन्याला निश्चित उत्पन्न पाहिजे असेल तर तुम्ही LIC च्या शांती योजनेत बिनधास्त गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला 11,192 रुपयांची मासिक पेन्शन मिळेल.

आता तुम्हाला LIC पेन्शन योजनेमध्ये एकूण दोन प्रकारचे पर्याय मिळतील. एक म्हणजे तुम्हाला सिंगल लाइफसाठी डिफर्ड अॅन्युइटी म्हणजेच एका व्यक्तीसाठी पेन्शन स्कीमचा लाभ घेता येईल. तर दुसरा पर्याय म्हणजे संयुक्त जीवनासाठी निश्चित वार्षिकी खरेदी करण्याचा पर्याय आहे. म्हणजे एकाच योजनेत दुहेरी फायदा.

तर त्याच वेळी 30 वर्षे ते 79 वर्षे वयोगटातील लोकांना या योजनेत सहज गुंतवणूक करता येईल. समजा ही योजना खरेदी केल्यानंतर, जर तुम्हाला ती आवडत नसल्यास अशा परिस्थितीत तुम्हाला ती सोप्या पद्धतीने सरेंडर करता येईल. तसेच या योजनेत तुम्हाला कमीत कमी 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. विशेष बाब म्हणजे यात जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नसते.

समजा एखाद्या व्यक्तीने एकच योजना घेतली असेल तर त्याच्या मृत्यूनंतर जमा करण्यात आलेली रक्कम नॉमिनीला दिली जाते. तर त्याच वेळी, पॉलिसीधारकाच्या हयातीवर, त्याला पेन्शनचा लाभ मिळतो. तसेच संयुक्त खात्यातील दोन्ही व्यक्तींच्या मृत्यूनंतर नॉमिनीला हे पैसे देण्यात येतात. जर तुम्ही या योजनेत 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 11,192 रुपयांची मासिक पेन्शन मिळेल.

तर त्याच वेळी, तुम्हाला ही पेन्शन दरमहा, त्रैमासिक किंवा वार्षिक आधारावर घेता येते. समजा तुम्ही या पेन्शन योजनेत गुंतवणूक केली तर, तुम्हाला तात्काळ ते 20 वर्षांच्या कालावधीत कधीही पेन्शन मिळते.