आर्थिक

LIC Policy : आता LIC च्या पॉलिसीचा होणार दुप्पट फायदा! मिळेल बंपर परतावा

Published by
Ahmednagarlive24 Office

LIC Policy : भारतीय आयुर्विमा निगम म्हणजेच LIC प्रत्येक वयोगटासाठी विमा योजना ऑफर करत असते. अशीच एक योजना एलआयसीने लाँच केली आहे. जीवन किरण पॉलिसी असे या विमा योजनेचे नाव आहे. समजा या योजनेच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा अकाली मृत्यू झाला तर ही योजना कुटुंबाला आर्थिक मदत पुरवते. इतकेच नाही तर तुम्ही एका वयापर्यंत जिवंत राहिला तर भरलेली एकूण प्रीमियम रक्कम परत करण्यात येते.

जाणून घ्या पॉलिसी

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात LIC ने जीवन किरण विमा योजना लाँच केली आहे. ही एक नॉन-लिंक्ड, गैर-सहभागी वैयक्तिक बचत योजना तसेच जीवन विमा योजना आहे.

परिपक्वता लाभ

या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकूण जमा प्रीमियम रक्कम पॉलिसीधारकाला मॅच्युरिटीवर देण्यात येते. ही पॉलिसी अंमलात आली तर मॅच्युरिटीवरील विमा रक्कम एलआयसीकडून नियमित प्रीमियम किंवा सिंगल प्रीमियम पेमेंट अंतर्गत प्राप्त झालेल्या एकूण प्रीमियमच्या बरोबरीची असणार आहे.

पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर मिळेल रक्कम

समजा पॉलिसीधारकाचा पॉलिसी मुदतीच्या आत मृत्यू झाला तर विम्याची रक्कम देण्यात येते. हे पेमेंट नियमित आणि एकल प्रीमियमच्या आधारावर असणार आहे. हे लक्षात घ्या की या योजनेत पहिल्या वर्षातील आत्महत्या वगळता अपघाती मृत्यूंसह सर्व प्रकारच्या मृत्यूंचा समावेश केलेला आहे.

  • समजा नियमित प्रीमियम पेमेंट पॉलिसी अंतर्गत मृत्यू झाला तर वार्षिक प्रीमियमच्या 7 पट किंवा मृत्यूच्या तारखेपर्यंत जमा केलेल्या एकूण प्रीमियमच्या 105%, किंवा मूळ विम्याची रक्कम देण्यात येईल.
  • सिंगल प्रीमियम पेमेंट पॉलिसी अंतर्गत, सिंगल प्रीमियमच्या 125% मृत्यूनंतर भरण्यात येतील. तसेच मूळ विमा रक्कम देण्यात येईल.

एकापेक्षा जास्त पेमेंट पर्याय

यात नॉमिनीला एकरकमी पेमेंट पर्याय देण्याशिवाय एकूण रक्कम हप्त्यांमध्ये म्हणजेच 5 समान हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय मिळतो.

अटी

LIC जीवन किरण जीवन विमा पॉलिसी अंतर्गत कमीत कमी मूळ विमा रक्कम रु. 15,00,000 इतकी आहे आणि जास्तीत जास्त मूलभूत विमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. पॉलिसीचा कमीत कमी कालावधी 10 वर्षे आणि कमाल पॉलिसीचा कालावधी 40 वर्षे इतका आहे. हे लक्षात घ्या की गृहिणी आणि गर्भवती महिला या योजनेसाठी पात्र नसतील.

Ahmednagarlive24 Office