आर्थिक

LIC Scheme: संधी सोडू नका ! ‘या’ योजनेत लोकांना घरी बसून मिळत आहेत 17 लाख रुपये, जाणून घ्या कसे

Published by
Ahmednagarlive24 Office

LIC Scheme:  तुम्ही देखील तुमच्या येणाऱ्या काळासाठी आर्थिक बचत करण्यासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची आहे. आम्ही तुम्हाला या लेखात एका मस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही घरी बसल्याबसल्या तब्बल 17 लाखांची कमाई करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट आणि बेस्ट योजनेबद्दल संपूर्ण माहिती.

आम्ही तुम्हाला आज देशातील सर्वात मोठी संस्था LIC ची जीवन लाभ योजनेबद्दल माहिती देत आहोत जी सध्या लोकांची मने जिंकत आहे. तुम्हाला तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल, तर तुम्हाला त्यात थोडी गुंतवणूक करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला 17 लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळेल. ही रक्कम कशी मिळवायची याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचावा लागेल.

जाणून घ्या योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी

LIC ची जीवन लाभ योजना आजकाल लोकांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे, ज्याचा तुम्ही आरामात लाभ घेऊ शकता. या योजनेत सहभागी होण्यास थोडाही उशीर केला, तर संधी तुमच्या हातून निघून जाऊ शकते. ही योजना एक मर्यादित प्रीमियम योजना आहे, जी लग्नासाठी आणि विशिष्ट वस्तूंच्या खरेदीसाठी डिझाइन केलेली आहे.

यामध्ये, वयाच्या 23 व्या वर्षी एक व्यक्ती 16 वर्षांसाठी टर्म प्लॅन आणि 10 लाख रुपयांची विमा रक्कम निवडण्यास प्राधान्य देते. या प्रकरणात, गुंतवणूकदाराला 10 वर्षांसाठी दररोज 233 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर 10 वर्षानंतर गुंतवणूकदार एकूण 855107 गुंतवणूक करू शकेल. यानंतर, ही रक्कम मॅच्युरिटीवर गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा केली जाते.

योजनेची वैशिष्ट्ये जाणून घ्या

LIC द्वारे चालवल्या जाणाऱ्या जीवन लाभ योजनेची अशी काही वैशिष्ट्ये आहेत, जी लोकांची मने जिंकण्यासाठी पुरेशी आहेत. 8 वर्षे ते 59 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी घेऊ शकते. त्याचा कालावधी 16 वर्षे ते 25 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. त्याच वेळी, गुंतवणूकदाराने किमान दोन लाख रुपयांची विमा रक्कम घेणे देखील आवश्यक आहे. यामध्ये कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. यामध्ये तुम्हाला टॅक्समध्ये सूटही दिली जाते.

हे पण वाचा :- Surya Rashi Parivartan 2023: सूर्यदेवाचा मीन राशीत प्रवेश ! ‘या’ राशीच्या लोकांनी काळजी घ्या नाहीतर होणार धनहानी

Ahmednagarlive24 Office