LIC चा शेअर्स करू शकतो लाखो रुपयांची कमाई , जाणून घ्या प्राईस टारगेटसह सर्व माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC share : LIC असे नाव की जो भारतातही बहुतेक सर्वच स्तरातील व्यक्तीला हे नाव माहित आहे. पैसे गुंतवणुकीचे एकदम विश्वसनीय सरकारी ठिकाण म्हणजे LIC . सध्या LIC च्या शेअर्सची एकदम सुमार कामगिरी राहिलेली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत प्रीमियममध्ये घेत झाल्याचा हा परिणाम आहे. परंतु हीच कमाईची संधी देखील होऊ शकते. याचे कारण असे की, ब्रोकरेज कंपनी मोतीलाल ओसवालने LIC चे शेअर्स 850 रुपयांच्या टार्गेट किमतीवर खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

जर या प्रमाणे टार्गेट प्राईस मिळाली तर जवळपास 40 टक्के प्रॉफिट तुम्हाला होईल. सध्या BSE वर LIC चा शेअर्स 614.70 रुपयांवर बंद झालेला होता. त्यामुळे सध्या LIC चा शेअर्स घेणं तुम्हाला प्रोफेटेबल ठेऊ शकत.

* LIC सध्या भरपूर प्रॉफेटमध्ये

LIC ने वित्तीय वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाईमध्ये 17,469 कोटींचा सर्वात जास्त सहामाही PAT नोंदवला आहे. विशेष म्हणजे यात 13,768 कोटी रुपये केवळ कर रूपातील आहेत. 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या पहिल्या सहामाही वित्तीय सेगमेंटमध्ये वैयक्तिक व्यवसायात LIC चा बाजारातील हिस्सा 40.35 टक्के आणि समूह व्यवसायात 70.26 टक्के होता.

त्यामुळे LIC ही सध्यातरी भरपूर प्रोफ़ेटेबल आहे. हे शेअर्समध्ये वाढ होईल असे दर्शवत आहे. ब्रोकरेज मोतीलाल ओसवाल यांच्या मतानुसार LIC कडे उद्योग-अग्रणी स्थान टिकवून ठेवण्याची आणि अत्यंत फायदेशीर उत्पादन विभागांमध्ये वाढीची गती वाढवण्याची क्षमता आहे.

एवढ्या मोठ्या संस्थेसाठी चांगल्या आणि विचारपूर्वक अंमलबजावणी योजनेची आवश्यकता आहे.

* एलआयसीला पूर्ण झाले 67 वर्ष

LIC ही देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी असून 1 सप्टेंबर 1956 रोजी त्याची स्थापना झाली होती. आज ही कंपनी 67 वर्षांची झालीये. 1956 मध्ये कंपनीचे केवळ 5 कोटी रुपये भांडवल होते या वर्षी 31 मार्च 2023 पर्यंत त्याची मालमत्ता 45.50 लाख कोटी रुपये झाली आहे.

त्याचा लाइफ फंड 40.81 लाख कोटी रुपयांचा आहे. 1956 मध्ये एलआयसीच्या कॉर्पोरेट कार्यालयाव्यतिरिक्त 5 क्षेत्रीय कार्यालये, 33 विभागीय कार्यालये आणि 212 शाखा कार्यालये होती.

2022 मध्ये LIC ची 2048 पूर्णपणे संगणकीकृत शाखा कार्यालये, 113 विभागीय कार्यालये, 8 क्षेत्रीय कार्यालये, 1381 डिविजनल कार्यालये आहेत.