एलआयसी ही सध्या भारतातील मोठी आयुर्विमा कंपनी आहे. शासनाची गॅरंटी असल्याने यामध्ये गुंतवणूक सुरक्षित असते. त्यामुळे यातील गुंतवणूकदारांची संख्या देखील फार मोठी आहे. दरम्यान LIC चे शेअर्स मार्केटमध्ये आल्यानंतर अनेकांनी त्वरित ते खरेदी केले. परंतु आजपर्यंत म्हणावा अशी ग्रोथ यात झालेली दिसली नाही. परंतु आज या शेअर्सने कमाल केली. आज सकाळपासून LIC चे शेअर्स सुमारे 50 रुपयांनी वाहदले आहेत. म्हणजेच एकाच दिवसात 8 टक्क्यांपेक्षा जास्त कमाई झाली आहे.
त्यामुळे आज एलआयसी शेअर्सधारकांना चांगलाच फायदा झाला आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये प्रीमियममध्ये डबल डिजिटमध्ये वाढ होईल असे सांगितले आहे.
किती होता शेअर्स
आज सकाळी मार्केट सुरु झाल्यानंतर साधारण 11 बाजेपर्यंत LIC चे शेअर्स 667 रुपयांच्या आसपास ट्रेंड करत होते. या शेअरमध्ये सुमारे 49 रुपयांची वाढ आहे. आज, 620.55 रुपयांपर्यंत खाली गेल्यानंर लआयसीचा शेअर 674.65 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. त्यामुळे आज एलआयसी शेअर्सवाल्यांची कमाई झाली. आज पहिल्यांदाच एवढी मोठी कमाई पाहायला मिळाली. आज LIC शेअर्सचे मार्केट कॅप 419,537 कोटी रुपये झाले आहे. गुंतवणूकदारांचा ओढा एलआयसीकडे वाढू शकतो असा अंदाज आहे.
LIC ने आजवर किती रिटर्न दिलाय माहितीये का?
LIC ने एका आठवड्यात 7.81 टक्के रिटर्न दिला आहे. जर आपण एका महिन्याचे रिटर्न पाहिले तर 7.32 टक्के रिटर्न एलआयसीने दिला आहे. LIC चा तीन महिन्यांचा रिटर्न 1.09 टक्के असून 1 जानेवारी 2023 पासूनचा परतावा 3.21 टक्के निगेटिव आहे. LIC शेअर्सचा 1 वर्षाचा रिटर्न 6.14 टक्के मिळालाय.
अचानक का आली तेजी
एलआयसीच्या शेअर्समध्ये आज अचानक तेजी का आली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु नुकतेच एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी असे जाहीर केले होते की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रिमिअममध्ये डबल अंकी वाढ होईल. एलआयसी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक नवीन सेवा देखील सुरू करणार आहे. याला बाजारात चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे बहुतेक आज यामध्ये तेजी आली असावी असा अंदाज आहे.