आर्थिक

पॅनकार्डचा वापर करा आणि झटपट कर्ज मिळवा! जाणून घ्या कशी आहे प्रोसेस?

Published by
Ratnakar Ashok Patil

Loan By Pan Card:- जीवनामध्ये बऱ्याचदा अचानकपणे पैशांची गरज भासते व आपल्याला हवे असलेले पैसे आपल्याकडे असतील असे होत नाही व अशा संकटकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळी मित्र किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत घेतली जाते किंवा बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन घेण्याला प्राधान्य दिले जाते.

परंतु बऱ्याचदा आपल्याला पाच ते दहा हजार रुपयांच्या कर्जाची गरज भासते व अशावेळी मात्र नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजेच एनबीएफसी आपल्याला ताबडतोब कर्ज उपलब्ध करून देतात.

या सगळ्या कर्ज प्रकारांमध्ये जर आपण बघितले तर तुम्ही पॅन कार्डचा वापर करून देखील पाच हजार रुपयांचे कर्ज झटपट घेऊ शकतात. पॅन कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्याची प्रोसेस नेमकी कशी आहे? याबद्दलची माहिती आपण बघू.

पॅन कार्डच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने घेता येते लोन
तुम्हाला जर झटपट पैशांची गरज भागवायची असेल तर पाच हजार रुपयांपर्यंतचे लोन तुम्ही पॅन कार्डचा वापर करून घेऊ शकतात व ही लोन घेण्याची प्रोसेस अत्यंत सोपी आहे.

आधार कार्ड हे जितके महत्त्वाचे कागदपत्रे आहे, तितकेच पॅन कार्ड देखील एक महत्त्वाचे कागदपत्र असून अनेक बँकिंगच्या कामांसाठी आपल्याला पॅन कार्डची मागणी केली जाते. त्यामुळे अचानकपणे पैशांची गरज भासली तर पॅन कार्डच्या माध्यमातून पाच हजार रुपयांचे लोन अगदी सोप्या पद्धतीने आपण मिळवू शकतो.

पॅन कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी अशा पद्धतीने अर्ज करा

1- पॅन कार्डच्या माध्यमातून जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती करावी लागेल की कोणती नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजेच एनबीएफसी संस्था आहे जी तुम्हाला कमीत कमी कागदपत्र घेऊन कमी रकमेचे कर्ज देऊ शकते.

2- तसेच अशा पद्धतीने कर्ज घेताना व्याजदर किती आहे हे तुम्ही तपासणे गरजेचे आहे व किती प्रमाणात या कर्जासाठी प्रोसेसिंग फी आकारली जाईल हे देखील पाहणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही जे कर्ज घेत आहात ते किती दिवसात फेडायचे आहे या सर्व गोष्टींची सगळी माहिती तुम्ही करून घेणे गरजेचे आहे.

3- ही सगळी माहिती घेतल्यानंतर ज्या संस्थेकडून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे त्या वित्तीय संस्थेच्या म्हणजेच एनबीएफसीच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे गरजेचे आहे किंवा ज्या ठिकाणाहून लोन तुम्हाला मिळू शकेल त्या एनबीएफसीच्या ब्रांचवर जाऊन अर्ज करावा.

यामध्ये लोन तुम्हाला कोणत्या गोष्टींसाठी हवे आहे व किती प्रमाणात हवे आहे? ही सगळी माहिती तुम्हाला द्यावी लागेल व तुमचा क्रेडिट स्कोर देखील कितीपर्यंत आहे? याचे देखील खूप महत्त्व यामध्ये आहे.

4- या सगळ्या गोष्टी केल्यानंतर कागदपत्र म्हणून तुमच्याकडे पॅन कार्ड मागितले जाते व काही वेळेस त्यामध्ये आधार कार्ड आणि इन्कम सर्टिफिकेट देखील मागितले जाऊ शकते.

5- अशा पद्धतीने तुम्ही एनबीएफसी कडून खरी माहिती देऊन ताबडतोब कर्ज प्राप्त करू शकतात.

Ratnakar Ashok Patil