Loan Update:- जीवनामध्ये व्यक्तीला अनेकदा अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी तातडीची पैशांची गरज भासते. परंतु बऱ्याचदा आर्थिक अडचण असल्यामुळे छोटी रक्कम देखील जमा करणे कठीण होऊन बसते. अशा प्रसंगी व्यक्ती अनेक ऑनलाइन माध्यमातून ज्या काही एनबीएफसी म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या कर्ज देतात त्यांच्याकडून कर्ज घेतात किंवा बँकेच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करतात.
यामध्ये एनबीएफसीचा विचार केला तर रिझर्व बँकेने मान्यता दिलेल्या अनेक नॉन बँकिंग वित्तीय संस्था असून त्या माध्यमातून व्यक्ती बऱ्याचदा आर्थिक गरज पूर्ण करतो. घेतलेल्या या कर्जाचे रक्कम ही ईएमआय स्वरूपात परतफेड करायला लागते.या अनुषंगानेच जर तुम्हाला ताबडतोब पैशांची गरज भासली तर एक महत्त्वाचे अपडेट असून तुम्हाला आता झटक्यात कमीत कमी हप्त्यावर कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे.
गुगल देईल आता सुलभ हप्त्यात कर्ज
तुम्हाला देखील पैशांची गरज असेल तर आता तुम्ही कमीत कमी व्याजदरांमध्ये पंधरा हजार रुपया पर्यंतचे कर्ज घेऊ शकणार आहात व ते देखील स्वस्त अशा हप्त्यावर. टेक जॉइंटनं जी पे एप्लीकेशन म्हणजेच गुगल पेवर सॅशे लोन लॉन्च केले असून या अंतर्गत गुगलच्या माध्यमातून आता भारतातील छोट्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना 15000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.
या कर्जाचे वैशिष्ट्य म्हणजे हे बिझनेस लोन तुम्हाला 111 रुपयाच्या सुरुवातीच्या किमतीमध्ये फेडता येणार आहे. यासंबंधीची महत्त्वाची माहिती गुगल इंडियाने दिली असून भारतातील व्यवसायिकांना जेव्हा छोट्या कर्जाची गरज असेल तेव्हा गुगलकडून अशा व्यवसायिकांना 15000 रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे. या कर्ज सुविधेची घोषणा गुगलने गुगल फॉर इंडियाच्या वार्षिक कार्यक्रमांमध्ये केली.
सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण
यामध्ये गुगल पेचा विचार केला तर डिजिटल व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणली असून जवळजवळ भारतामध्ये 12000 कोटी रुपयांचे घोटाळे थांबवण्यास गुगल पेने मदत केली आहे. गुगलने कर्ज देणारी साडेतीन हजार ॲप्स काढून टाकली आहेत व गुगल पे आता अगोदर पेक्षा अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय बनले आहे.
सध्या गुगल पे हे उत्कृष्ट रियल टाईम कोड लेव्हल स्कॅनिंग सह येते. याकरिता गुगलने देशातील प्रमुख वित्तीय संस्थांसोबत भागीदारी केली असून एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्यासोबतच टीयर टू शहरांकरिता तीस हजार रुपयांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्या लोकांकरिता गुगल पे च्या माध्यमातून कर्ज दिलं जात आहे.
त्यामुळे नक्कीच आता छोट्या व्यवसायिकांना तात्काळ 15000 रुपयाचे कर्ज आणि तेही सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध होणार असल्यामुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे.