Mahindra XUV 300 Facelift : महिंद्रा लवकरच भारतीय बाजारपेठेत आपली नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. खरंतर कंपनीची Mahindra XUV 300 ही खूप लोकप्रिय कार मानली जाते.
आता कंपनी ही कार नव्या अवतारात बाजारात लॉन्च करू शकते. त्याचबरोबर या कारमध्ये अनेक बदलही केले जाऊ शकतात. असा अंदाज वर्तवला जात आहे की कंपनी 2024 च्या सुरूवातीस बाजारात लॉन्च करू शकते. यासोबतच या कारमध्ये नवीन आणि अॅडव्हान्स फीचर्सही दिले जाऊ शकतात. चला यात मिळणाऱ्या काही फीचर्स बद्दल जाणून घेऊया-
नवीन Mahindra XUV 300 फेसलिफ्ट चाचणी दरम्यान अनेक वेळा स्पॉट झाली आहे. या कारच्या पुढील आणि मागे अनेक बदल करण्यात आले आहेत. सी-आकाराचे एलईडी हेडलॅम्प, फ्रंट ग्रिल आणि मोठी सेंट्रल एअर-इन टेक सिस्टीम या कारमध्ये दिसेल. नवीन अलॉय व्हीलसह साइड प्रोफाइलमध्ये काही बदल केले जातील. त्याच वेळी, पुन्हा डिझाइन केलेले टेलगेट, इत्यादी फीचर्स आत पाहायला मिळतील.
वैशिष्ट्ये
या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगण्याच तर, कंपनी अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, रिअर पार्किंग सेन्सर कॅमेरा, मोठे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एअरबॅग्ज यांसारखे अनेक फीचर्स देऊ शकते.
पॉवरट्रेन
या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीकडून या कारमध्ये 1.2 लीटर, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे इंजिन 113 Bhp ची कमाल पॉवर जनरेट करेल. त्याच वेळी, या कारमध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन देखील दिले जाऊ शकते. हे इंजिन जास्तीत जास्त 117 Bhp पॉवर निर्माण करण्यास सक्षम असेल. यात AMT गिअरबॉक्सच्या जागी टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक युनिटचा समावेश असू शकतो.
किंमत
या कारच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण असा अंदाज वर्तवला जात आहे की कंपनी ही कार 10 लाख रुपयांपर्यंतच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत बाजारात आणू शकते. तसेच तज्ज्ञांच्या मते कंपनीची ही कार लॉन्च झाल्यानंतर मारुती सुझुकी ब्रेझाला थेट टक्कर देऊ शकते.