Canara Bank New FD Interest Rate:- मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार असून गुंतवणूकदारांमध्ये विश्वासार्ह पर्याय म्हणून देखील ओळखला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केली जाते. आपल्याला माहित आहे की देशातील प्रत्येक बँकेच्या माध्यमातून अनेक आकर्षक अशा मुदत ठेव योजना राबवल्या जातात व कालावधीनुसार वेगवेगळा व्याजदर दिला जातो.
गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून बरेच गुंतवणूकदार बँकेच्या मुदत ठेव योजनांना प्राधान्य देतात. याच पद्धतीने तुम्हाला जर एफडी करायची असेल व चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुमच्या करिता कॅनरा बँकेत एफडी केली तर फायद्याचे ठरू शकते.
त्यामधील प्रमुख कारण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने मुदत ठेवींच्या व्याजदरांमध्ये बदल केला असून तीन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवीसाठी डिसेंबर पासून नवीन व्याजदर बँकेने लागू केलेले आहेत.
सध्या कॅनरा बँक सात दिवस ते दहा वर्षाच्या कालावधीतील एफडी करिता चार टक्क्यांपासून ते 7.40% पर्यंत व्याज देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता 180 दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीकरिता 0.50% अतिरिक्त व्याज देत असून ज्येष्ठ नागरिकांसाठी किमान चार टक्के आणि कमाल 7.90% पर्यंत व्याजदर कॅनरा बँकेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
किती दिवसांच्या एफडीवर मिळेल सर्वाधिक परतावा?
सध्या कॅनरा बँक तीन वर्ष आणि त्याहून अधिक ते पाच वर्षापर्यंत केलेल्या एफडीवर सर्वाधिक परतावा देत आहे. या परताव्याचे स्वरूप पाहिले तर सामान्य नागरिकांकरिता 7.40% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.90% इतका व्याजदर सध्या दिला जात आहे.
कॅनरा बँक सामान्य नागरिकांना 7.30% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.80% व्याज दोन वर्ष आणि अधिक ते तीन वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी देत आहे.
जास्त परतावा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून 444 दिवसांची एफडी केली तर सामान्य नागरिकांना 7.25% व्याज दिले जात आहे. एक वर्षाच्या कालावधीच्या एफडी करिता सर्वसामान्य नागरिकांना 6.85% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.35% इतकी व्याज मिळत आहे.
कालावधीनुसार कॅनरा बँकेतून फिक्स डिपॉझिट वर मिळणारा व्याजदर
सात ते 45 दिवसांकरिता चार टक्के, 46 ते 90 दिवसांकरिता 5.25%, 91 ते 179 दिवसांकरिता 5.50%, 180 ते 269 दिवसांकरिता 6.15%, 270 ते एक वर्षापेक्षा कमी कालावधी करिता 6.25%, एक वर्षाच्या कालावधी करिता 6.45%,444 दिवसांकरिता 7.25%,
एक वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी एफडी करिता 6.85%, दोन वर्ष ते तीन वर्षापेक्षा कमी कालावधी करिता 7.30%, तीन वर्ष ते पाच वर्षापेक्षा कमी कालावधी करिता 7.40% आणि पाच वर्ष ते दहा वर्ष या कालावधी करिता 6.70% इतका व्याजदर दिला जात आहे.