आजकाल सर्वानाच श्रीमंत व्हायचं असत. प्रत्येक व्यक्ती पैशांसाठीच खटाटोप करताना दिसतो. जर तुम्हाला तुमचा मुलगाही पुढे जाऊन करोडपती व्हावा असे वाटत असेल ना? पण तुम्ही विचार कराल की तो मोठा होणार , कमावणार व मग तो कुठे श्रीमंत होणार…थांबा ! थांबा !
तुमचा मुलगा वयाच्या 25 व्या वर्षीच करोडपती होऊ शकतो.यासाठी तूम्हाला फक्त गुंतवणुकीचे योग नियोजन करावे लागेल. मुलाला करोडपती बनवायला जास्त पैसे लागणार नाहीत.
फक्त दर महिन्याला फक्त 5500 रुपये गुंतवले तरी 25 व्या वर्षी मुल करोडपती होईल. जर तुमचे अपत्य नुकतेच जन्मले असेल किंवा तो एक किंवा दोन वर्षांचा असेल,
तर त्याच्या नावावर कोणत्याही चांगल्या म्युच्युअल फंड योजनेत SIP द्वारे गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. ही गुंतवणूक दरमहा 5500 रुपये असेल व दरवर्षी सरासरी 12 टक्के जर रिटर्न मिळाले तर 25 वर्षांत 1 कोटी रुपयांहून अधिक फंड जमा होईल.
योग्य नियोजन
पैसे गुंतवणुकीचे योग्य नियोजन तुम्हाला व तुमच्या अपत्याला आर्थिक सक्षम बनवेल. येथे आम्ही तुम्हाला काही 12 टक्के वार्षिक रिटर्न देणाऱ्या टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांची लिस्ट दिली आहे.
यामध्ये सध्यातरी 12 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिलेलं आहेत. हे आर्थिक नियोजन 25 वर्षांच्या गुंतवणुकीसाठी आहे. त्यानुसार तुम्ही योग्य कॅल्क्युलेट करून नियोजन करू शकता.
टॉप 10 म्यूचुअल फंड स्कीम
– क्वांट स्मॉल कॅप फंड स्कीमने मागील 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 46.26 टक्के रिटर्न दिलाय
– निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड स्कीमने मागील 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 43.51 टक्के रिटर्न दिलाय
– ICICI प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर स्कीमने मागील 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 42.95 टक्के रिटर्न दिलाय
– एचडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 42.69 टक्के परतावा देत आहे.
– क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजना गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 42.32 टक्के परतावा देत आहे.
– HSBC स्मॉल कॅप योजनेत गुंतवणूक देखील फायद्याची राहिली आहे. गेल्या 3 वर्षांपासून याने दरवर्षी सरासरी 41.67 टक्के परतावा दिला आहे.
– ICICI प्रुडेन्शियल भारत 22 FoF योजना गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 40.22 टक्के परतावा देत आहे.
– HDFC स्मॉल कॅप योजना गेल्या 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 39.76 टक्के परतावा देत आहे.
– टाटा स्मॉल कॅप स्कीम जर आपण पहिली तर मागील 3 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 39.75 टक्के रिटर्न मिळत आहे.
– आदित्य बिर्ला सन लाइफ पीएसयू इक्विटी फंड देखील यात भारी ठरला आहे. हा देखील टॉप 10 यादीत येतो. यामध्ये गेल्या ३ वर्षांपासून दरवर्षी सरासरी 39.45 टक्के रिटर्न मिळत आहे.