आर्थिक

Business Idea: एकदाच गुंतवणूक करा आणि वर्षाला 5 ते 10 लाखापर्यंत कमवा! वाचा या अनोख्या व्यवसायाची ए टू झेड माहिती

Published by
Ajay Patil

Business Idea:- सध्या नोकऱ्याची उपलब्धता खूपच कमी असल्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण तरुणी आता व्यवसायाकडे वळताहेत. व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त तुम्ही योग्य आणि बाजारपेठेत मागणी असलेले व्यवसायाची निवड करणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही योग्य अशा व्यवसायाची निवड केली तर तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीतून देखील आयुष्यभर काही लाखांमध्ये नफा मिळवू शकतात.

अशा व्यवसायांची यादी पाहिली तर ती भली मोठी यादी आहे. तुम्ही ज्या परिसरामध्ये व्यवसाय उभारणार आहात त्या ठिकाणी असलेली मागणी लक्षात घेणे देखील तेवढेच गरजेचे असते. या अनुषंगाने आपण या लेखांमध्ये अशा एका व्यवसायाची माहिती घेणार आहोत की त्यातील उत्पादनाची मागणी खूपच जास्त आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये ती आणखी वाढणार अशी शक्यता आहे व हा व्यवसाय आहे कार्डबोर्डचा व्यवसाय होय.

आपल्याला माहित आहे की सध्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत असून ऑनलाईन वस्तूंची मागणी देखील आता मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे कार्डबोर्ड व्यवसायाची मागणी दिवसेंदिवस वाढल्याचे आपल्याला दिसून येते. ऑनलाइन वस्तू विकणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत ते त्यांचे लहान मोठे सगळे उत्पादन कार्डबोर्ड मध्ये पॅकिंग करून पाठवतात व याशिवाय रिटेल स्टोअरमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तू देखील कार्डबोर्ड मध्ये पॅकिंग करून विकल्या जातात. त्यामुळे येणारा भविष्यकाळ या व्यवसायासाठी खूप उज्वल आहे.

कार्डबोर्डचा व्यवसाय कसा सुरू करायचा?

कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला अगोदर कच्चा माल लागतो व या व्यवसायासाठी देखील तुम्हाला क्राफ्ट पेपर हा कच्चा माल लागतो. बाजारामध्ये जर तुम्ही क्राफ्ट पेपर घ्यायला गेले तर तो 30 ते 40 रुपये प्रति किलो मिळतो. तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचे कार्डबोर्ड म्हणजेच बॉक्स तयार करायचे असतील तर त्यासाठी क्राफ्ट पेपरची कॉलिटी देखील चांगली असणे गरजेचे आहे.

हा व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला पाच हजार स्क्वेअर फुट इतकी जागा लागते. कारण या व्यवसायासाठी तुम्हाला प्लांट उभारणे गरजेचे असते व कच्चामाल ठेवण्यासाठी गोदाम देखील लागते. हा व्यवसाय सुरू करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गर्दीच्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू करू नये.

 कार्डबोर्ड व्यवसायसाठी कोणती यंत्रे लागतात?

या व्यवसायासाठी लागणारी जी काही यंत्र असतात ती महागडी असतात. कार्डबोर्ड तयार करण्याकरिता ते कापावे लागतात व ते कापण्यासाठी सेमी ऑटोमॅटिक आणि फुल ऑटोमॅटिक यंत्रांचा वापर करावा लागतो. तुम्हाला हा व्यवसाय छोट्या प्रमाणामध्ये सुरू करायचा असेल तर तुम्ही सेमी ऑटोमॅटिक यंत्राची खरेदी करून सुरू करू शकतात.

या उलट मात्र तुम्हाला मोठ्या स्वरूपात हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला फुल ऑटोमॅटिक मशीन योग्य ठरते. समजा तुम्हाला सेमी ऑटोमॅटिक मशीन घेतले तर त्याकरिता वीस लाख रुपये खर्च करणे गरजेचे राहील व फुल ऑटोमॅटिक मशीन करिता 50 लाख रुपये खर्च करणे गरजेचे आहे.

 या व्यवसायातून किती नफा मिळवू शकतात?

या व्यवसायाच्या माध्यमातून चांगला पैसा मिळवता येऊ शकतो. साधारणपणे कार्डबोर्डची मागणी वर्षभरात एकसारखेच असते व अलीकडच्या काळामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांची बाजारपेठ खूप वेगात वाढत असल्यामुळे बऱ्याच लोकांना आता ऑनलाइन शॉपिंग करणे आवडते.

त्यामुळे  ऑनलाईन माल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मजबूत असे कार्डबोर्ड असावे लागते. या व्यवसायामध्ये खूप उत्तम नफा मिळतो. व्यवसाय सुरू केल्यानंतर कालांतराने तुमची ग्राहकांची संख्येत वाढ झाली असेल किंवा तुम्ही चांगले मार्केटिंग करून हा व्यवसाय सुरू केला असेल तर तुम्ही एका वर्षासाठी पाच ते दहा लाख रुपयांची कमाई सहजपणे करू शकतात.

Ajay Patil